Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 18 October 2025

ओळख शास्त्रज्ञांची - आर्यभट्ट प्रथम

 ओळख शास्त्रज्ञांची - आर्यभट्ट प्रथम

प्राचीन भारतातील थोर गणिती

आर्यभट्ट प्रथम


भारताला थोर परंपरा लाभलेली आहे. पूर्वी देखीला भारत हा एक अत्यंत संपन्न देश होता. तेथील लोक विज्ञान, गणित, साहित्य, कला आदी क्षेत्रात प्रगत होते, म्हणून तर भारतावर विदेशी लोकांच्या नेहमी स्वाऱ्या होत. 


पूर्वीच्या काळी आर्यभट्ट नावाचा एक विद्वान गणिती होऊन गेला. त्याच्या घराण्याविषयी तसेच जन्मकाळविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याने लिहिलेले तीन ग्रंथ आज उपलब्ध आहेत. दशगीतिका, आर्यभट्टीय आणि तंत्र हे ग्रंथ सहाव्या शतकात लिहिले असे त्या ग्रंथामधील मजकूरावरून समजतं.


आर्यभट्टीय या आपल्या ग्रंथात त्याने अक्षरांकाचा सर्वात प्रथम वापर केला. वर्णमालेची त्याने यासाठी मदत घेतली. क, ख, ग, घ पासून प वर्गापर्यंतची २५ अक्षरे १ ते २५ अंकासाठी त्याने वापरली. य ते ह या आठ वर्णांचा ३०,४०,५० ते १०० हे अंक मोजण्यासाठी त्याने उपयोग केला. ज्योतिष अन गणित हे एकच आहेत असं पूर्वी समजत असत. ती दोन वेगळी शास्त्रं आहेत हे प्रथम आर्यभट्टने दाखवून दिले..


आर्यभट्टीय मधे १२१ श्लोक आहेत. त्यांचे चार भाग पाडले जातात. 

१) गितीकापाद :- यात अक्षरांच्या आधारे संक्षेपात संख्या कशी लिहावी हे दाखवलं आहे. 

२) गणितपाद :- यात अंकगणित, बीजगणित इत्यादींचे नियम सूत्ररूपाने दिलेले आहेत.

३)कालक्रियापाद :- कालगणना, युगे तसेच ग्रहांची गती विषयी माहिती यात आहे. 

४) गोलपाद :- आकाशातील ग्रहताऱ्यांची माहिती, सूर्यापासून त्यांची अंतरे, ग्रहण वर्तवण्याची रीत इत्यादी यात आहे. या ग्रंथात वर्ष म्हणजे ३६५ दिवस, २५ घटी, ३१ पळे व १५ विपले एवढा काळ असतो असे त्याने नमूद केलेले आहे. 


आज आपण युरोपिय पध्दतीने वर्षमापन करतो. त्या पध्दतीपेक्षा आर्यभट्टने सांगितलेले वर्ष हे केवळ 3 मिनिटे १९ सेकंदानी जास्त होते.पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते हे त्याने सांगितले. ग्रहणाविषयी लोकांचे जे गैरसमज होते ते त्यामुळे दूर झाले. राहू चंद्राला खाऊन टाकतो म्हणून चंद्राला ग्रहण लागतं यासारख्या भाकड गोष्टी त्याने वेशीवर टांगल्या. त्याच्या आर्यभट्टीय ग्रंथाचा दक्षिण भारतात वापर अधिक झाल्याचे दिसून येते. 


आर्यभट्टीय पुस्तकातील तत्त्वांच्या आधारे तयार केलेले पंचांग आजही दक्षिण भारतातील वैष्णव पंथियांमध्ये लोकप्रिय आहे. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते तसेच चंद्रग्रहण याविषयी आर्यभट्टचे विचार महत्त्वाचे होते मात्र त्याच्यानंतरच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर या विचारासाठी टीका केली. आर्यभट्टीय ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे. एक सेनगुप्त यांचा आहे तर दुसरा क्लार्क यांचा. 


आर्यभट्ट याच्या ज्ञानाविषयी देशविदेशातील लोकांना माहित झाले. दशदेशिका सूत्र व आर्यष्टशत हे. आणखी दोन ग्रंथ आर्यभट्टने लिहिल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अशा या थोर गणितीचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने आपल्या पहिल्या अंतरिक्षयानाला 'आर्यभट्ट' हे नाव दिले.


आर्यभट्टचा जन्म इ.स. ४७६ मधे झाला असे मानले जाते. त्याच्यानंतर आर्यभट्ट नावाचा दुसरा गणित अन ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक इ.स. ९५० च्या आसपास होऊन गेला. दोघांचे विषय अन नाव एकच असल्यामुळे त्यांच्या कार्याविषयी गोंधळ होण्याची मात्र शक्यता वाटते.

No comments:

Post a Comment