बल व बलाचे प्रकार-
खालील ठळक मुद्द्यांचा अभ्यास करा व चाचणी सोडवण्यासाठी सर्वात खाली क्लिक करा.
◆ दैनंदिन जीवनामध्ये अनेक क्रिया करण्यासाठी आपल्याला जोर लावावा लागतो, म्हणजेच आपल्याला बलाची आवश्यकता असते. कोणतीही निर्जीव वस्तू स्वतःहून जागा बदलू शकत नाही. जर बलाचा वापर झाला तरच ती जागा बदलते.
एखाद्या गतीमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा तिच्या गतीमध्ये बदल करण्यासाठी बलाची गरज असते.
वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते.
● स्नायु बल -
आपल्या सर्व हालचाली स्नायू आणि हाडाच्या मदतीने होत असतात .म्हणून स्नायूने लावलेल्या बलाला स्नायू बाल म्हणतात.
उदाहरण एखादी जाड वस्तू ढकलणे सायकल चालवणे हाताने कपडे धुणे
● यांत्रिक बल
वेगवेगळी कामे सहजपणे व्हावी म्हणून आपण यंत्रांचा उपयोग करत असतो काही यंत्र आपण स्नायू बळाचा वापर करून वापरत असतो तर काही यंत्रे स्वयंचलित असतात ही यंत्रे विजेवर किंवा इंधनावर चालतात म्हणजेच त्यासाठी यांत्रिक बळाचा वापर केला जातो.
उदाहरण -हातपंप, शिवणयंत्र ,नांगर, कपडे धुण्याची मशीन,मिक्सर इत्यादी.
● गुरुत्वीय बल -
पृथ्वी सर्व वस्तु आपल्या दिशेने खेचून घेते या बलाला गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण असे सुद्धा म्हणतात .
सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. वस्तू वर फेकताना बलाची आवश्यकता असते. या बलाची दिशा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. या विरुद्ध दिशेच्या बलामुळे वस्तूची गती कमी होते. शेवटी ही गती शून्य होऊन वस्तू खाली पडते . या खाली पडणाऱ्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्य करत असते.
उदाहरण - वर फेकलेला चेंडू खाली पडतो, झाडावरील फळ खाली पडते.
● चुंबकीय बल -
चुंबक काही वस्तू स्वतःकडे खेचून घेतो .या खेचण्याच्या बलाला चुंबकीय बल म्हणतात .
उदाहरण -क्रेन -फ्रिजचा दरवाजा.
● घर्षण बल -
जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकावर घासले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण निर्माण होते. या घर्षणातून घर्षण बल तयार होते.
घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षण बलाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये होत असतो.
आपण जमिनीवर चालताना घर्षण बलामुळे चालू शकतो.खाली घसरून पडत नाही.
चिकट , तेलकट पृष्ठभागावरून मात्र घर्षण बल नसल्याने आपण घसरू शकतो.
गरजेप्रमाणे घर्षण बल कमी-अधिक सुद्धा करता येते.
●स्थितिक विद्युत बल -
आपण एखाद्या कागदाचे बारीक कपटे करून टेबलवर ठेवले आणि थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्याजवळ आणले ,तसेच प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा केली तर असे लक्षात येते की कागदाचे कपटे,आपले केस हे हालचाल दर्शवतात.
या सर्व गोष्टींमध्ये स्थितीत विद्युत बल निर्माण होते. म्हणून ही हालचाल दिसते.
रबर, प्लास्टिक ,एबोनाट अशा पदार्थावर विद्युतप्रभार निर्माण होतो.
विद्युतभारित पदार्थावर निर्माण होणाऱ्या बलाला स्थितिक विद्युत बल म्हणतात.
● एकत्रित बले -
जेव्हा एकाच क्रियेत निरनिराळी बले एकत्रितपणे कार्य करतात, तेव्हा त्याला एकत्रित बले असे म्हणतात.
◆ एक किंवा अधिक भले कार्यरत असलेल्या क्रिया आकाशातून जाणारे विमान या क्रियेमध्ये यांत्रिक बल, स्नायु बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल हे एकत्रितपणे कार्य करत असतात.
उसाच्या चरखातून रस काढणे या क्रियेमध्ये यांत्रिक बल ,स्नायु बल व घर्षण बल एकत्रितपणे कार्य करत असते.
धान्य पाखडणे या क्रियेमध्ये स्नायु बल व गुरुत्वीय बल एकत्रितपणे कार्य करत असते.
◆ आपल्या रोजच्या जीवनामधील स्नायू बलाची काही उदाहरणे बघूया--
सामान उचलणे ,सायकल चालवणे, क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे ,स्कूल बॅग पाठीवर घेऊन जाणे ,वजन हातात घेऊन व्यायाम करणे अशा अनेक कार्यामध्ये आपण स्नायू बलाचा वापर करत असतो.
◆ स्नायू बलावर चालणारी यंत्रे-
हातगाडी, नांगर, होडीची वल्ले, बैलगाडी, घोडागाडी, सायकल, पाटा-वरवंटा इत्यादी.
◆चाचणी सोडविण्यासाठी-
क्लिक करा

◆बलाचे प्रकार - स्नायु बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल.
● स्नायु बल -
आपल्या सर्व हालचाली स्नायू आणि हाडाच्या मदतीने होत असतात .म्हणून स्नायूने लावलेल्या बलाला स्नायू बाल म्हणतात.
उदाहरण एखादी जाड वस्तू ढकलणे सायकल चालवणे हाताने कपडे धुणे
![]() |
स्नायू बल |
● यांत्रिक बल
वेगवेगळी कामे सहजपणे व्हावी म्हणून आपण यंत्रांचा उपयोग करत असतो काही यंत्र आपण स्नायू बळाचा वापर करून वापरत असतो तर काही यंत्रे स्वयंचलित असतात ही यंत्रे विजेवर किंवा इंधनावर चालतात म्हणजेच त्यासाठी यांत्रिक बळाचा वापर केला जातो.
उदाहरण -हातपंप, शिवणयंत्र ,नांगर, कपडे धुण्याची मशीन,मिक्सर इत्यादी.
● गुरुत्वीय बल -
पृथ्वी सर्व वस्तु आपल्या दिशेने खेचून घेते या बलाला गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण असे सुद्धा म्हणतात .
सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. वस्तू वर फेकताना बलाची आवश्यकता असते. या बलाची दिशा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. या विरुद्ध दिशेच्या बलामुळे वस्तूची गती कमी होते. शेवटी ही गती शून्य होऊन वस्तू खाली पडते . या खाली पडणाऱ्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्य करत असते.
उदाहरण - वर फेकलेला चेंडू खाली पडतो, झाडावरील फळ खाली पडते.
![]() |
गुरुत्वीय बल |
● चुंबकीय बल -
चुंबक काही वस्तू स्वतःकडे खेचून घेतो .या खेचण्याच्या बलाला चुंबकीय बल म्हणतात .
उदाहरण -क्रेन -फ्रिजचा दरवाजा.
● घर्षण बल -
जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकावर घासले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण निर्माण होते. या घर्षणातून घर्षण बल तयार होते.
घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षण बलाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये होत असतो.
आपण जमिनीवर चालताना घर्षण बलामुळे चालू शकतो.खाली घसरून पडत नाही.
चिकट , तेलकट पृष्ठभागावरून मात्र घर्षण बल नसल्याने आपण घसरू शकतो.
गरजेप्रमाणे घर्षण बल कमी-अधिक सुद्धा करता येते.
![]() |
घर्षण बल |
आपण एखाद्या कागदाचे बारीक कपटे करून टेबलवर ठेवले आणि थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्याजवळ आणले ,तसेच प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा केली तर असे लक्षात येते की कागदाचे कपटे,आपले केस हे हालचाल दर्शवतात.
या सर्व गोष्टींमध्ये स्थितीत विद्युत बल निर्माण होते. म्हणून ही हालचाल दिसते.
रबर, प्लास्टिक ,एबोनाट अशा पदार्थावर विद्युतप्रभार निर्माण होतो.
विद्युतभारित पदार्थावर निर्माण होणाऱ्या बलाला स्थितिक विद्युत बल म्हणतात.
● एकत्रित बले -
जेव्हा एकाच क्रियेत निरनिराळी बले एकत्रितपणे कार्य करतात, तेव्हा त्याला एकत्रित बले असे म्हणतात.
◆ एक किंवा अधिक भले कार्यरत असलेल्या क्रिया आकाशातून जाणारे विमान या क्रियेमध्ये यांत्रिक बल, स्नायु बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल हे एकत्रितपणे कार्य करत असतात.
उसाच्या चरखातून रस काढणे या क्रियेमध्ये यांत्रिक बल ,स्नायु बल व घर्षण बल एकत्रितपणे कार्य करत असते.
धान्य पाखडणे या क्रियेमध्ये स्नायु बल व गुरुत्वीय बल एकत्रितपणे कार्य करत असते.
◆ आपल्या रोजच्या जीवनामधील स्नायू बलाची काही उदाहरणे बघूया--
सामान उचलणे ,सायकल चालवणे, क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे ,स्कूल बॅग पाठीवर घेऊन जाणे ,वजन हातात घेऊन व्यायाम करणे अशा अनेक कार्यामध्ये आपण स्नायू बलाचा वापर करत असतो.
◆ स्नायू बलावर चालणारी यंत्रे-
हातगाडी, नांगर, होडीची वल्ले, बैलगाडी, घोडागाडी, सायकल, पाटा-वरवंटा इत्यादी.
◆चाचणी सोडविण्यासाठी-
क्लिक करा
No comments:
Post a Comment