Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 30 July 2020

11. कार्य आणि ऊर्जा Online Test

कार्य आणि ऊर्जा
● पाठातील खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि  सर्वात खाली चाचणी सोडण्यासाठी  क्लिक करा.

● कोणत्याही वस्तूला बल लावल्यामुळे तिचे विस्थापन होते आणि विस्थापन झाले की कार्य होते .
 कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. म्हणून कार्य आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध असतो.
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. खेळत असताना आपल्याला स्नायू ऊर्जा याचा उपयोग होतो आणि ती ऊर्जा बलामध्ये रूपांतरित होते .या बलामुळे कार्य घडते.
धावणाऱ्या आणि चालणाऱ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते.

प्रत्येकाची ऊर्जेची क्षमता ही निरनिराळी असते.
ऊर्जेची रूपे -
यांत्रिक उर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी उर्जा ,रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही  ऊर्जेची रूपे आहेत.

यांत्रिक उर्जा
यंत्राच्या मदतीने मिळणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात.
यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितीमुळे असलेली स्थितिज ऊर्जा आणि गतीमुळे असलेली गतिज ऊर्जा.
स्थितिज ऊर्जा
वस्तूमध्ये साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे ही स्थितीज ऊर्जा त्या पदार्थांमध्ये साठवलेली असते. कॅरम खेळत असताना सुद्धा स्ट्रायकर मध्ये आपल्या स्नायूची ऊर्जा जाते आणि त्याची स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये बदलते.



● गतिज ऊर्जा
गतीमुळे आलेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा होय.
उष्णता ऊर्जा 
सूर्यामुळे पृथ्वीवरच्या सर्व सजीवांना उष्णता ऊर्जा मिळते.इंधनाच्या ज्वलनाने देखील उष्णता ऊर्जेची निर्मिती होते.
उष्णता मोजण्यासाठी कॅलरी हे एकक वापरतात.
प्रकाश ऊर्जा
सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती आपल्या पानातील हरितद्रव्य याचा वापर करून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने अन्न तयार करतात. हे घडत असताना प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्न ऊर्जेमध्ये होते.

ध्वनि ऊर्जा
ध्वनी हेसुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे. ध्वनी मध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे ध्वनि ऊर्जा होय.
रासायनिक ऊर्जा
रासायनिक क्रिया यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हणतात. ज्वलनामधून निरनिराळ्या स्वरूपात रासायनिक ऊर्जा बाहेर पडत असते.
लेड ऍसिड बॅटरी मध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी रासायनिक क्रिया केल्या जातात. फटाके पेटवली की त्यातून उष्णता, ध्वनी,प्रकाश आणि रासायनिक ऊर्जा एकदम बाहेर पडतात.

विद्युत ऊर्जा
निरनिराळी उपकरणे विद्युत ऊर्जेवर चालतात. विद्युत ऊर्जा दैनंदिन जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहे.

ऊर्जेचे रूपांतरण
निसर्गात ऊर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित होत असते याला ऊर्जेचे रूपांतरण असे म्हणतात.
सूर्य हा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.

ऊर्जा चक्र
सूर्याची उष्णता जमिनीवर आली की पाण्याची वाफ होते आणि त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा तयार होते .
पाण्याची वाफ थंड झाल्यानंतर तिचे ढग बनतात. ढग थंड झाल्यानंतर पाऊस पडतो, या ठिकाणी गतिज ऊर्जा तयार होते.
पावसाचे पाणी धरणामध्ये साठवले जाते या साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. धरणातील पाणी सोडले की त्यामधून गतिज ऊर्जा निर्माण होते. या पाण्यातून जलविद्युत केंद्र चालतात.पुन्हा तेथून गतिज ऊर्जा तयार होते. या गतिज ऊर्जा मधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि विद्युत ऊर्जा वापरून घरामधील विविध उपकरणे चालतात. जसे प्रकाश, ध्वनी आणि उष्णता यावर चालणारी यंत्रे.

ऊर्जा स्त्रोत
ऊर्जा मिळवण्यासाठी ज्या साधनांचा वापर होतो त्यांना ऊर्जास्त्रोत म्हणतात.
ऊर्जा स्त्रोत यांचे वर्गीकरण दोन प्रकारात होते.
पारंपारिक ऊर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत 
पुन्हा निर्माण न करता येणाऱ्या ऊर्जा स्त्रोत यांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात.
हे संपून जाऊ शकतात म्हणून आपल्याला पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा विचार करावा लागतो.
उदाहरण जीवाश्म इंधने, लाकूड, कोळसा, गोवर्‍या इत्यादी .
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत 
पुन्हा पुन्हा वापरता येतील असे ऊर्जा स्त्रोत.
 हे ऊर्जा स्त्रोत अक्षय आणि अखंड असतात. उदाहरण. सौरऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरी पासून मिळणारी ऊर्जा, अणू उर्जा .
सौर ऊर्जा
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा होय.पृथ्वीवर ही ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये पोहोचत असते.
 सौरचुली, सौर जलतापक, सौर शुष्कक आणि सौरविद्युत घट ही सौर उर्जेवर चालणारी उपकरणे आता लोकप्रिय झाली आहेत.
पवन ऊर्जा
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून पवनचक्की मध्ये विद्युत निर्मिती केली जाते.
या पवन ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो.
सागरी ऊर्जा
भरती-ओहोटीच्या लाटांनी जनित्र फिरवून या लाटांपासून सागरी ऊर्जा निर्माण करता येते.
जल विद्युत ऊर्जा
धरणांमध्ये साठलेले पाणी उंचावरून खाली आणले जाते व त्याद्वारे जनित्राची पाती फिरवली जातात.अशा जलविद्युत केंद्रात वीज निर्मिती करण्यात येते.
महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
समुद्र लहरी पासून मिळणारी ऊर्जा
समुद्राच्या वर-खाली होणाऱ्या लाटांपासून अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करता येते.
अणू उर्जा
युरेनियम थोरियम या जड मूलद्रव्याच्या अणूच्या विघटना द्वारे निघणार्‍या ऊर्जेला अणू  ऊर्जा असे म्हणतात.

ऊर्जा बचत
ऊर्जेची बचत करणे म्हणजेच ऊर्जेची निर्मिती करणे होय.
ऊर्जा बचत ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे.ऊर्जेची बचत केली नाही तर जागतिक तापमान वाढी सारखं भयंकर संकट आपल्यावर येऊ शकते.
हरित ऊर्जा 
ज्या स्त्रोतातून कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्‍साईड असे घातक वायू वातावरणात सोडले जात नाही अशा ऊर्जेला हरित ऊर्जा म्हणतात.हरित ऊर्जा स्त्रोत जास्तीत जास्त प्रमाणात वापरला गेला पाहिजे.

चाचणी सोडविण्यासाठी
क्लिक करा
.

No comments:

Post a Comment