Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 21 July 2020

1.नैसर्गिक संसाधने Online Test

सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा 

नैसर्गिक संसाधने मध्ये हवा पाणी व जमीन यांचा समावेश होतो त्याबद्दल आपण माहिती घेऊ .
हवा -
पृथ्वीच्या सभोवताली संपूर्ण हवा असते आणि हवा ही अनेक वायूचे मिश्रण असते. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन ,कार्बन डाय-ऑक्साइड त्याचबरोबर  काही निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड ,धूलिकण असे  घटक असतात .

पृथ्वीच्या भोवतालीआवरणामध्ये हवेच्या एकूण 80 % वायू हे  तपांबरांमध्ये असतात. 19 % वायू हे स्थितांबर मध्ये असतात.
 दलांबर मध्ये हे प्रमाण खूपच कमी असते व बाह्यांबर मध्ये सुद्धा वायूचे प्रमाण कमी असते .
 हे पृष्ठभागाजवळ जास्त असते परंतु जसे आपण वर जाऊ तसतसे ते  कमी होत जाते.

 हवेमध्ये असलेल्या सर्व वायूंचा उपयोग आपल्याला होत असतो त्यामध्ये
नायट्रोजन
चा उपयोग सजीवांच्या प्रति निर्मितीमध्ये अमोनियानिर्मितीमध्ये आणि खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी सुद्धा होतो.
 ऑक्सिजन
आपल्याला श्वसन आणि ज्वलनासाठी मदत करतो.
 कार्बन डाय-ऑक्साइड
प्रकाश संश्लेषण आणि अग्निशामक नळकांड्या मध्ये याचा उपयोग होतो
अरगॉन
 यांचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये
हेलियमचा
उपयोग कमी तापमानासाठी आणि विना पंख्याचा इंजिनावर चालणारी या विमानात होतो
निऑनचा
उपयोग हा रस्त्यावरच्या जाहिरातीचे बोर्ड असतात त्यामध्ये होतो त्यांचा उपयोग आपल्याला या पाईप मध्ये होतो.
 झेनॉन
या वायूचा उपयोग आपल्याला फ्लॅश फोटोग्राफी यामध्ये होतो .
अशा पद्धतीने वायू मध्ये आपल्याला जे काही घटक असतात त्यांचा उपयोग होतो.

वायू प्रदूषण ही एक फार मोठी समस्या आहे आणि ती जर आपल्याला रोखायचे असेल तर आपल्याला इंधनाच्या ज्वलनातून जे काही घातक घटक आपल्या हवेमध्ये मिसळतात त्यावर आपल्याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे.
 त्याचबरोबर ओझोन चा थर हा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो की ज्यामुळे सूर्यापासून मिळणाऱ्या अतिनील किरणांना तो आपल्या मध्ये शोषून घेतो आणि आपल्याला उपयोगी असे सूर्यकिरण आपल्याला देतो म्हणून त्याला सुद्धा पृथ्वीचा रक्षक संरक्षक कवच असे सुद्धा म्हणतात.



पाणी
पाणी ही सर्व सजीवांची एक मूलभूत गरज आहे. आणि प्रत्येक सजीवाला पिण्यासाठी त्याच्या शरीराच्या आकारमानानुसार पाणी लागत असते. हायड्रोजन वायूचे हवेमध्ये ज्वलन होऊन तो ऑक्सिजन बरोबर संयोग पावला की त्यापासून पाणी तयार होते .
पाणी तीन अवस्थांमध्ये आढळते पाण्याला रंग ,वास किंवा चव नसते आणि पाणी हे एक वैश्विक द्रावक आहे, ज्यामध्ये सर्व पदार्थ विरघळू शकतात. प्राण्यांच्या शरीरामध्ये रक्त आणि वनस्पतींची रसद्रव्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते.  पाण्याला जीवन असे म्हणतात कारण कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही.

 पृथ्वीवर पिण्याचा साठी जे काही पाणी आहे ते खूप कमी प्रमाणात आहे हे जलचक्र मार्फत तयार होते ,ज्यामध्ये ओढे, नदी, छोटी तळी  समुद्र, महासागर यामधील पाणी बाष्पीभवन होऊन त्याचे ढग तयार होतात आणि पुन्हा  त्यापासून आपल्या पृथ्वीवर पाणी मिळते .

पाण्याचा वापर आपण काळजीपूर्वक आणि काटकसरीने केला पाहिजे .
पाणी अडवले पाहिजे ,पाणी जिरवले पाहिजे. त्यामुळे आपल्या गर्भामध्ये पाण्याची पातळी वाढू शकते .
पाणी कधीच शिळे होत नाही म्हणून त्याचा आपण पुनर्वापर नेहमी केला पाहिजे.


जमीन

माती दगड आणि खडक यांपासून जमीन बनलेली असते .
सर्व सजीवांना जमीन आसरा देते .
माणूस  शेती, निवास आणि रस्ते यासाठी जमिनीचा वापर करतो .
जमिनीवरच्या जंगलातील प्राणी आणि वनस्पती यांचा सुद्धा आपण वापर करतो.
 मृदेचे थर असतात ज्यामध्ये कुथित मृदा  अपरिपक्व मृदा ,लहान खडक मिश्रित मातीचा थर आणि सर्वात खाली मुळ खडक असतो. वनस्पती आणि मृत प्राण्यांच्या अवशेषांचे कुजल्यामुळे  कुथित मृदे मध्ये रूपांतर होते आणि हा सर्वात परिपक्व तर सर्वात वर असतो.
 मृदा तयार होण्याची प्रक्रिया फार संथ गतीने होत असते .आणि ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
 ऊन ,वारा ,पाऊस, उष्णता, थंडी यामुळे त्याचबरोबर सूक्ष्मजीव ,कृमी ,कीटक ,उंदीर ,घूस यासारख्या प्राण्यामुळे तिचा अपक्षय होत असतो.

 परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी हजार वर्षाचा कालावधी लागतो म्हणून आपण तीचे संरक्षण केले पाहिजे, तीचे संवर्धन केले पाहिजे.


या पाठावरील चाचणी सोडविण्यासाठी    

2 comments: