सजीवातील विविधता आणि वर्गीकरण
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆पृथ्वीवरील सर्व सजीव म्हणजेच वनस्पती आणि प्राणी हे एकसारखे नसतात.
पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये विविधता असते.
●भिन्न ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जी क्षमता सजीवांमध्ये असते त्यामुळे सजीवांमध्ये विविधता आढळून येते.
वनस्पतीमध्ये
स्वयंपोषी वनस्पती- स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या,
परपोषी वनस्पती- अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून असणाऱ्या
आणि कीटक पक्षी- अन्न म्हणून कीटक खाणार्या वनस्पती अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात .
वनस्पतीची रचना यामध्ये वनस्पतीचे जमिनीच्या खाली असणारे भाग आणि जमिनीच्या वर असणारे भाग यांचा समावेश होतो.
वनस्पती चे अवयव हे मूळ, खोड, पान, फुल आणि फळ हे आहेत.
◆ मूळ
मूळ वनस्पतीला आधार देण्याचे काम करते.
माती घट्ट धरून ठेवते .
त्याचबरोबर वनस्पतीला पाणी आणि पोषण तत्वाचा शोषण करून पुरवठा सुद्धा करते.
गाजर आणि मुळा यामध्ये वनस्पतीचे अन्नसाठा करण्याचे काम सुद्धा मूळ करतात.
मुळांचे दोन प्रकार आहेत- सोटमूळ आणि तंतुमय
मूळ.
◆खोड
खोट हा जमीनीच्या वर वाढणारा भाग आहे. वनस्पतीची उंची ही खोडावर अवलंबून असते.
खोड हे अन्ननिर्मिती ,अन्नाचा वहन करणे, अन्नाचा साठा करणे आणि काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते.
याशिवाय वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचे सुद्धा काम करते.
◆पान
वनस्पतीचे अन्न तयार करण्याचे काम पान करते. पानाचे त्याच्या रचनेनुसार साधे पान आणि संयुक्त पान हे प्रकार पडतात. प्रकाश संश्लेषण क्रिया पानांमध्ये होते.
◆फुल
फुल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे.
फुलांना रंग आणि वास असतो.
फुल पुनरुत्पादनाचे कार्य सुद्धा करतात.
◆फळ
फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात.
काही फळांमध्ये एक तर काहींमध्ये अनेक बिया असतात.
घेवडा ,वाटाणा यांच्या शेंगा म्हणजेच फळे आहे.
वनस्पतींचे वर्गीकरण ----
वनस्पतीचे वर्गीकरण खोड ,जीवनक्रम, फुले आणि अधिवास यानुसार होते.
खोडावरून-
खोडांचा आकार आणि उंचीनुसार वनस्पतीचे वृक्ष, झुडूप, रोपटे,वेली असे वर्गीकरण होते.
वृक्षांचे खोड टणक असते आणि ते उंच वाढतात आंबा, वड ,चिंच.
झुडूप
हे दोन ते तीन मीटर पर्यंत वाढते.
याचे खोड टणक असते.
उदाहरण कन्हेर ,जास्वंद, घाणेरी.
रोपटे
रोपट्यांची उंची एक ते दीड मीटर पर्यंत असते.
त्याचे खोड लवचिक व हिरवे असते.
उदाहरण .मेथी ,सदाफुली
वेली
वेलींना वाढ होण्यासाठी आधाराची गरज असते. उदाहरण .भोपळा, कलिंगड, द्राक्ष, मनीप्लांट.
![]() |
Add caption |
वनस्पतींचा जीवनक्रम
यावरून वनस्पतीचे
वार्षिक वनस्पती - केवळ एकच वर्ष जिवंत राहणाऱ्या,
द्विवार्षिक वनस्पती -दोन वर्षे जिवंत राहणाऱ्या आणि बहुवार्षिक वनस्पती -वर्षानुवर्षे जिवंत राहणाऱ्या असे प्रकार पडतात.
ज्वारी बाजरी गहू मका झेंडू या वार्षिक वनस्पती आहे .
गाजर बीट या द्विवार्षिक वनस्पती आहे .
विविध वृक्ष हे बहुवार्षिक वनस्पती आहे.
फुलांवरून
वनस्पतीचे सपुष्प वनस्पती म्हणजे फुले येणाऱ्या वनस्पती व अपुष्प वनस्पती म्हणजे फुले न येणाऱ्या वनस्पती असे प्रकार पडतात.
प्राण्यांचे वर्गीकरण
अधिवासा नुसार प्राण्यांचे जमिनीवर राहणारे भूचर. उदाहरण. हरिण ,वाघ ,ससा, मानव.
पाण्यात राहणारे जलचर . उदाहरण मासे
जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकणारे उभयचर. उदाहरण बेडूक ,सॅलॅमॅनडर
व आकाशात उडू शकणारे खेचर . उदाहरण आकाशात उडणारे पक्षी असे वर्गीकरण होते.
पेशी रचनेनुसार एकपेशीय व बहुपेशीय सजीव असे वर्गीकरण होते .
पाठीच्या कण्यावरून पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे वर्गीकरण होते .
प्रजननाच्या पद्धतीवरून अंडज आणि जरायुज असे दोन प्रकार पडतात.
अंडज म्हणजे अंडी घालून पिलांना जन्म देणारे उदाहरण .साप ,पक्षी ,मासे .
जरायुज म्हणजे पिलांना जन्म देणारे
उदाहरण .सस्तन प्राणी
सजीव सृष्टी मधील वनस्पती आणि प्राणी यांच्या मध्ये खूप मोठी विविधता आढळून येते.
प्रत्येक वनस्पती आणि प्राणी हे महत्त्वपूर्ण आहेत म्हणून सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चाचणी सोडविण्यासाठी
No comments:
Post a Comment