सजीव सृष्टी या पाठातील ठळक मुद्द्यांचे वाचन करायचे आहे आणि वाचन करून त्या खाली दिलेली चाचणी सोडवायची आहे.
सजीव सृष्टी
आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सजीव आणि निर्जीव असतात.
त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात आणि सजीवांची ही जी काही वैशिष्ट्ये असतात त्यांना सजीवांची लक्षणे असे म्हणतात.
वाढ होणे,श्वसन ,उत्सर्जन प्रजनन चेतना क्षमता, हालचाल ,ठराविक आयुर्मान ,पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत.
वाढ-
प्रत्यक्ष जीवाची वाढ ही ठराविक काळामध्ये होत असते मानवाच्या वाढीसाठी 18 ते 21 हा कालावधी असतो .या काळामध्ये उंची वजन आणि ताकद वाढत असते .
वनस्पतीची वाढ ही वनस्पतीच्या खोडाची जाडी आणि उंची यामध्ये होत असते. काही झाडांना फांद्या फुटतात आणि वनस्पती जिवंत असेपर्यंत त्यांची वाढ होत राहते.
श्वसन
सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो आणि त्यामुळे ते श्वसन करतात.
श्वसन म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजन घेणे आणि शरीरातून कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर सोडणे. प्राण्यांमध्ये श्वसनासाठी श्वसन इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोडावरील आणि पानावरील छिद्रावाटे श्वसन करतात.
मासे हे त्याच्या कल्ल्या मार्फत श्वसन करतात.
उत्सर्जन
सजीवांच्या शरीरामध्ये निरुपयोगी व टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना उत्सर्ग असे म्हणतात.
आणि हे उत्सर्ग शरीराच्या बाहेर फेकण्याची क्रिया असते तिला उत्सर्जन असे म्हणतात.
उत्सर्जनाचे कार्य ठराविक अवयवा मार्फत होत असते .
वनस्पतीमध्ये उत्सर्ग हा पिकल्या पानांबरोबर किंवा खोडाच्या सालीत बरोबर गळून पडतात आणि बाष्परूपाने सुद्धा वनस्पती पाण्याचे उत्सर्जन करतात.
प्रजनन
सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतो या निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात .
काही प्राणी पिल्लांना जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालतात आणि त्यामधून पिल्ले बाहेर पडतात.
वनस्पतीची नवीन रोपे ही बिया, खोडे, पाने यापासून तयार होतात.
चेतना क्षमता व हालचाल
सर्व सजीव हे चेतनेला प्रतिसाद देतात आणि या प्रतिसादाच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात.
हालचाल ही सुद्धा एक स्वयंप्रेरणेने होणारी घटना असते .
प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी स्वतःला हालचाल करतात. वनस्पती आपली जागा सोडत नाही परंतु जागच्याजागी त्यांची थोडी हालचाल होत असते.
ठराविक आयुर्मान
प्रत्येक सजीवाचा जीवनकाल हा ठराविक काळापुरता असतो .त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. प्रत्येक प्राण्यांची आणि वनस्पतीची आयुर्मर्यादा ही वेगवेगळी असते .
जसे की कुत्रा 12 ते 18 वर्षे जगतो.
शहामृग या 50 वर्षे जगतो .
गॅलोपेगॉस बेटावरील महाकासव हा 170 वर्षे जगतो.
मे फ्लाय कीटक 1 ते 24 तास जिवंत राहतात.
पेशीमय रचना
सर्व सजीवांचे शरीर पेशींपासून बनलेले असते जे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव अशा मध्ये विभागले गेले आहेत .
एक पेशीय सजीव मध्ये एकाच पेशीपासून शरीर बनलेले असते.
उदाहरणार्थ अमिबा,जिवाणू.
बहुपेशीय सजीव
अनेक पेशींपासून बनलेले असतात.
मानव,उंदीर,मोठे वृक्ष हे बहुपेशीय सजीव आहे.
सजीवांमध्ये उपयुक्त सजीव आणि अपायकारक सजीव असे दोन प्रकार पडतात.
उपयुक्त सजीव
अन्नासाठी मेथी ,बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर केला जातो.
औषधी उपयोगासाठी अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा उपयोग केला जातो.
प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगी पडतात.
यामध्ये कुत्रा, मांजर ,गाय असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात.
मासे ,मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. तर घोडा बैल उंट यासारखे प्राणी व्यवसायासाठी सुद्धा उपयोगी पडतात.
गांडूळ हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो.
अपायकारक सजीव
काही वनस्पती व प्राणी हे मानवाला अपायकारक असतात.
उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो .
झुरळे ,उंदीर, घूस अन्नाची नासाडी करतात. त्याचबरोबर काही प्रकारच्या विषारी पाली ,कोळी, साप ,विंचू चावल्यास मानवाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो .
जंगलातील हत्ती हासुद्धा नासधूस करणारा प्राणी आहे .
प्राण्यांप्रमाणे वनस्पती सुद्धा अपायकारक ठरतात. जसे की गाजरगवत ,तण, अमरवेल खाजकुईली च्या शेंगा ,अळूची पाने, कन्हेर, घाणेरी ,धोतरा ,कवक शेवाळे या वनस्पती सुद्धा आपल्याला अपायकारक ठरू शकतात.
वरील घटकांवर आधारित चाचणी सोडवा.
No comments:
Post a Comment