Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday, 27 July 2020

7.पोषण आणि आहार Online Test

पोषण आणि आहार
खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.

पोषण-
सजीवांना ऊर्जा मिळवणे ,वाढ होणे आणि आजारापासून प्रतिकार करणे या कामासाठी पोषणाची आवश्यकता असते.
ही पोषकतत्वे अन्नामधून मिळतात.
 कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही निराळी पोषकतत्वे आहेत.

जीवनसत्त्वे


कर्बोदके-
कर्बोदके -ही आपल्याला भात पोळी भाकरी आणि तृणधान्य यापासून मिळतात कर्बोदके ही ऊर्जादायी पदार्थ म्हणून कार्य करतात.

स्निग्ध पदार्थ- तेल तूप आणि लोणी यामधून मिळतात हे सुद्धा ऊर्जा'दायी पदार्थ म्हणून कार्य करतात .

प्रथिने - कडधान्य, मांस ,मासे, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यापासून मिळतात. आपल्या शरीराची वाढ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे कार्य करतात.
खनिजे- फळे ,पालेभाज्या, दूध, मीठ यापासून मिळतात .शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे कार्य करतात.
जीवनसत्वे- फळे आणि भाज्या यामधून मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे कार्य करतात.

किलो कॅलरी
 अन्न पदार्थांमधून किती उष्णता मिळते हे मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात. वाढत्या वयातील मुलामुलींना दररोज सरासरी 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते .

खनिजे- लोह, कॅल्शियम व फॉस्फरस, आयोडीन, सोडियम पोटॅशियम हे खनिजे आहेत. हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहेत.
लोह -
आपल्याला पालेभाज्या, मास, सफरचंद ,मनुका यापासून मिळतात.
लोहा चे कार्य रक्तपेशी मार्फत ऑक्सिजनचे वहन करणे हे असते. जर आपल्या शरीरात लोह कमी पडले तर आपल्याला ॲनिमिया, पंडुरोग हा आजार होऊ शकतो.

कॅल्शियम व फॉस्फरस- मांस, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यामधून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळते. हाडे व दात मजबूत करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
 यांचा अभाव जर शरीरात असेल तर दातांचे विकार हाडे कमकुवत होणे हे आजार होतात.


आयोडीन -आयोडीनयुक्त मीठ, मासे ,मनुका यापासून आयोडीन मिळते.
 वाढीचे नियंत्रण ठेवणे, शरीरातील रासायनिक क्रिया यांची गती वाढवणे हे आयोडीनचे कार्य आहे .
आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होऊ शकतो .
सोडियम व पोटॅशियम -मीठ, मांस, पालेभाज्या डाळी ,फळे हे स्त्रोत आहेत.
 शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था आणि स्नायुच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य करतात. यांच्या अभावामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढीस लागते.

जीवनसत्वे जीवनसत्वांचे जलविद्राव्य व जलविद्राव्य असे दोन प्रकार पडतात.
A जीवनसत्व -
पिवळ्या रंगाच्या व लाल रंगाच्या भाज्या फळे, दूध ,लोणी, हिरव्या भाज्या, रताळे यापासून हे जीवनसत्व मिळते.
डोळ्यांचे, त्वचेचे आणि दाताचे आरोग्य राखण्याचे कार्य हे करतात.
 जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, झिरो डर्मा हे आजार होतात.

B1 जीवनसत्व-
 स्त्रोत- दूध ,मासे, मांस, तृणधान्य, डाळी, कवचाची फळे .
कार्य - चेतातंतू आणि हृदयाचे योग्य कार्य करण्यासाठी मदत करतात..
 अभावजन्य आजार -बेरी-बेरी ,स्नायूंचा अशक्तपणा हा आजार होऊ शकतो.
B 9-  जीवनसत्त्व
 स्त्रोत- पालेभाज्या, पपई ,किवी यापासून मिळते. कार्य -शरीराची वाढ होणे
 अभावजन्य आजार -वाढ खुंटून जाते.  ॲनिमिया ,विसराळूपणा हे आजार होऊ शकतात.
 ● B 12 - जीवनसत्व
स्त्रोत -मांस, यकृत
 कार्य -लाल रक्तपेशींची निर्मिती करणे.
 अभावजन्य आजार -ॲनिमिया
C जीवनसत्व -
लिंबूवर्गीय फळे ,आवळा, संत्र ,आंबट पदार्थ, पालेभाज्या
कार्य - शरीरांतर्गत उती आरोग्य राखणे, हिरड्या दात  यांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक.
 अभावजन्य आजार -स्कर्वी, ग्रंथीना सूज, न भरणाऱ्या जखमा होणे.
D जीवनसत्व-
 स्त्रोत -सूर्यप्रकाश, दूध, मांस, अंडी, लोणी, मासे कार्य -कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणासाठी आवश्यक.
 अभावजन्य आजार -मुडदूस, हाडे अशक्त होणे, वेदना
E जीवनसत्व -
स्त्रोत -वनस्पती तेल ,शेंगदाणे, बदाम, हिरव्या भाज्या
कार्य -पेशीमधील चयापचय क्रिया चे नियमन करणे .पुनरुत्पादन करणे
अभाव जन्य आजार -त्वचेचे विकार ,स्नायू कमकुवत होणे, पुनरुत्पादन प्रक्रियेत अडथळा.
K जीवनसत्व -
स्त्रोत -पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, अंड्यातील पिवळा बलक
कार्य -रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो.
अभावजन्य आजार -अति रक्तस्त्राव होणे.

उष्णता व प्रकाश यामुळे जीवनसत्व नष्ट होतात.
C जीवनसत्व लवकर नष्ट होते,
 म्हणून C जीवनसत्व युक्त पदार्थ न शिजवता कच्चे खावेत.

संतुलित आहार
 सर्व पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असलेल्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.
> संतुलित आहारामुळे पोषण चांगल्याप्रकारे होते. > शरीर निरोगी आणि धडधाकट राहते .
> मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. > काम करण्याची क्षमता मिळते .
> रोगप्रतिकार शक्ती वाढते .

तंतुमय पदार्थ
आपल्या रोजच्या आहारात पुरेशा तंतूमय पदार्थांचा समावेश असला पाहिजे.

पाणी 
 एक पोषक तत्व आहे,, दूध, ताक, सरबत, फळांचे रस ,भरपूर पाणी शरीरात दररोज गेले पाहिजे .

कुपोषण -
आहारामध्ये सर्व पोषकतत्वे न मिळाल्यामुळे, असंतुलित आहारामुळे कुपोषण होते .
तसेच गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यामुळे अतिपोषण होते .
अतिपोषण हा सुद्धा असंतुलित आहाराचा परिणाम आहे.

जंक फूड -
चटपटीत ,चविष्ट लागणारे परंतु पोषकतत्व नसलेले पदार्थ शरीराला काहीही उपयोगी नसतात अशा पदार्थांना जंकफूड म्हणतात.
 चॉकलेट ,बर्गर ,नूडल्स, चिप्स ,वेफर्स, शीतपेय, कुरकुरे हे जंकफूड जास्त खाऊ नये .
जंक फूड

लठ्ठपणा
टाळण्यासाठी
> संतुलित आहार घ्यावा. पुरेशा प्रमाणात व्यायाम करावा .
> भूक नसताना खाऊ नये.
> जंक फूड टाळावे.
> मोटार गाड्या चा कमी वापर करावा.
अन्नपदार्थातील भेसळ- चांगल्या अन्नपदार्थात त्याच्यासारखेच स्वस्त आणि अतिरिक्त पदार्थ मिसळणे याला अन्नातील भेसळ म्हणतात.
अन्नातील भेसळ ही आरोग्यास घातक असते, त्यामुळे भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

चाचणी सोडविण्यासाठी

1 comment: