Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 25 July 2020

6.पदार्थ आपल्या वापरातील Online Test

पदार्थ आपल्या वापरातील 
या पाठातील खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.

● पदार्थ हे कणापासून बनलेले असतात व पदार्थ पासून वस्तू बनतात. 
पदार्थात असलेल्या गुणधर्माप्रमाणे त्याच्या वस्तू तयार करता येतात. एकाच पदार्थ पासून अनेक वस्तू सुद्धा निर्माण करता येतात .उदाहरण -कापूस, लोखंड, ॲल्युमिनियम या पदार्थांपासून अनेक वस्तू तयार केल्या जातात.

पदार्थांचे वर्गीकरण नैसर्गिकमानवनिर्मित असे होते .

नैसर्गिक पदार्थ निसर्गात उपलब्ध होतात.
नैसर्गिक पदार्थात सजीवापासून मिळणारे पदार्थ म्हणजे जैविक पदार्थ आणि सजीवापासून न मिळणारे पदार्थ म्हणजे अजैविक पदार्थ असे वर्गीकरण होते.
जैविक पदार्थ
प्राणिजन्य- दूध, चामडे ,लाख, रेशीम, लोकर .
वनस्पतिजन्य पदार्थ -लाकूड, कापुस, अंबाडी.

अजैविक पदार्थ -दगड, माती, लोखंड.

मानवनिर्मित पदार्थ -
उपलब्ध पदार्थावर विविध रासायनिक प्रक्रिया करून मानवाने तयार केलेले पदार्थ म्हणजे मानवनिर्मित पदार्थ.
 मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप जास्त आहे. माणसाच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा  वापर करून अनेक वस्तू बनवल्या जातात.
मानव निर्मित पदार्थ आणि त्यांचे उपयोग

बांधकामासाठी -विटा ,सिमेंट, काँक्रीट , प्लास्टिकचे पत्रे, मातीची कौले इत्यादी .
लेखनासाठी मानवनिर्मित पदार्थ.
 प्लास्टिक ,धातू ,पेन-पेन्सिल ,कागद ,वह्या.
वस्त्रांसाठी वापरण्यात येणारे मानवनिर्मित पदार्थ नायलॉन रेयॉन . 

 मानवनिर्मित पदार्थ तयार करताना नैसर्गिक पदार्थाच्या घटकांमध्ये बदल होतो आणि हे बदल कायमस्वरूपी असतात त्यापासून मूळ पदार्थ पुन्हा तयार करता येत नाही.

रबर 
रबराच्या झाडाच्या चिकापासून रबर बनवतात या पिकाला लेटेक्स असे म्हणतात. पांढरा रंग आणि विशिष्ट गंध असलेल्या रबराचा आपल्याला खूप उपयोग होतो.

रबर
रबरनिर्मिती


 व्हल्कनायझेशन
 रबर आणि गंधक एकत्र तीन ते चार तास तापवले जाते आणि त्यापासून रबर टणक बनवले जाते या क्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात.
 चार्ल्स गुडइयर यांनी व्हल्कनायझेशन या प्रक्रियेचा शोध लावला. रबराच्या झाडांची लागवड प्रथम ब्राझीलमध्ये झाली.
 भारतातील केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.

कागद
 वनस्पतीच्या सेल्युलोज धाग्यामुळे कागद बनतो. गवत, लाकूड, चिंध्या, रद्दी या पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतवून त्याचे जाळे तयार करून कागद तयार केला जातो.
 सूचिपर्णी वृक्षांचा लाकडाच्या ओंडक्यांची साले काढून त्याचे बारीक तुकडे केले जातात.
 हे तुकडे काही रसायन मिश्रण करून काही काळ भिजत ठेवतात ,त्यामुळे लाकडातील सेल्युलोज तंतू वेगळे होतात .
या लगद्यामध्ये रंगद्रव्य मिसळली जातात आणि तो लगदा रोलर्स मधून चपटा करून वाळवून त्याचा कागद तयार केला जातो.
कागद तयार करण्याचा  शोध प्रथम चीन देशामध्ये लागला.
 कागदाचा शक्यतो जास्तीत जास्त पुनर्वापर करावा.
कागद उपयोग

कृत्रिम धागे 
नायलॉन ,डेक्रॉन, टेरेलीन, पॉलिस्टर रेऑन असे अनेक कृत्रिम धागे आहेत.

नायलॉन 
हा शब्द N Y न्यूयॉर्क आणि लंडन या शहरांच्या नावावरून तयार करण्यात आला आहे. कारण नायलॉन धाग्याचा शोध या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी लागला .
मासेमारीची जाळी, दोरखंड आणि वस्त्र तयार करणे यासाठी नायलॉन चा उपयोग होतो.

रेयॉन 
म्हणजे सूर्य किरणा सारखे प्रकाशमान कापूस आणि लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साइड या रसायनात विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणा पासून कच्चे धागे तयार केले जातात.
 याला कृत्रिम रेशीम असे सुद्धा म्हणतात.

डेक्रॉन, टेरेलीन आणि टेरिन हे धागे खनिज तेलातील हायड्रोकार्बन घटकापासून बनवतात. निरनिराळी रसायने वापरली की वेगवेगळ्या गुणधर्माचे धागे तयार करता येतात.

कृत्रिम धागे


कृत्रिम धाग्यांचे गुण 

> मोठ्या प्रमाणावर या दागिन्यांची निर्मिती होते.
> त्यांची किंमत कमी असते .
> हे धागे टिकाऊ आणि मजबूत असतात.
> कृत्रिम धागे दीर्घकाळ वापरता येतात.
> हे जलरोधक असतात.
> कृत्रिम धागे वापरण्यासाठी हलके आणि सोयीस्कर असतात.
> हे धागे चमकदार आणि पोशाखी पणा वाढवणारे असतात .
> सुरकुत्या आणि ओरखडे या धाग्यावर पडत नाही.

●कृत्रिम धाग्यांचे दोष

> उन्हाळ्यात वापरण्यास अयोग्य असतात.
 > कृत्रिम धागे जलरोधक असल्याने घाम शोषला जात नाही .
> त्याचे कपडे घातल्यावर त्वचा सतत ओलसर राहते आणि त्वचा विकार होऊ शकतात.
>  हे लवकर पेट घेतात आणि पेटल्यावर अंगाला चिकटवून राहिल्यामुळे गंभीर जखमा होऊ शकतात. 
> सूक्ष्मजीवामार्फत या धाग्यांचे विघटन होत नाही.

चाचणी सोडविण्यासाठी



No comments:

Post a Comment