इयत्ता सातवी-इतिहास
पाठ 1- इतिहासाची साधने
प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मध्ययुगाचा काळ हा ढोबळ मानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका अखेर पर्यंतचा मानला जातो.
भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय.
इतिहास हा शब्द- इति+ ह+ हास अशा शब्दांनी तयार झालेला आहे.
इतिहासाचा अर्थ असे घडले असा होतो .
व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. इतिहासाची साधने 3 प्रकारचे असतात -भौतिक साधने, लिखित साधने, आणि मौखिक साधने
या साधनांचा थोडक्यात आढावा घेऊ.
◆ भौतिक साधने
ज्या ऐतिहासिक घटनांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो त्या ऐतिहासिक घटनेचा चिकित्सकपणे अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे असते आणि त्यासाठी
भौतिक साधने हे एक इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जातात.
भौतिक साधनांमध्ये किल्ले, स्मारके, इमारती ,लेणी, शिलालेख नाणी ताम्रपट अशा साधनांचा समावेश होतो वरील सर्व वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात .
भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही प्रकार आहेत जसे की गिरीदुर्ग,वनदुर्ग, जलदुर्ग ,भुईकोट अशाप्रकारे तसेच
स्मारकामध्ये सुद्धा समाधी ,कबर, वीरगळ
इमारतीमध्ये राजवाडे ,मंत्री निवास ,राणीवसा ,सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो .
वास्तु कलेची प्रगती आपल्याला ऐतिहासिक कालखंड समजून जाते.
● राज्यकर्त्यांनी सोने चांदी तांबे अशा धातूंचा वापर करून काही ऐतिहासिक नाणी तयार केलेली होती त्यांना सुद्धा भौतिक साधने असे म्हणतात.
शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख.
उदाहरण- तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरामधील लेख ,चालुक्य, राष्ट्रकूट यादव या राजांच्या काळामध्ये कोरलेले अनेक शिलालेख बघायला मिळतात.
शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो.
शिलालेखांमधून भाषा लिपी समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात.ताम्रपटावर राजाची आज्ञा निवडे इत्यादी प्रकारची माहिती भरलेली असायची.
◆ लिखित साधने
प्राचीन काळातील देवगिरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आधी लिपीची वळणे विविध भाषांची रूपे ,भूर्जपत्रे, पोथ्या ,ग्रंथ, फर्माने, चरित्रे, चित्र यावरून त्या काळातील ऐतिहासिक घटनांची माहिती मिळत असते.
तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ ,लोकजीवन ,भाषा सणसमारंभ यांचीसुद्धा माहिती या साधनाद्वारे मिळत असे.या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात.
लिखित साधनांमध्ये ,राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे ,वंशावळी, शकावली ,पत्रव्यवहार ,खलिते
न्यायनिवाडे ,आज्ञापत्र ग्रंथ,चरित्र ,परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णन ,बखरी, तवारिख अशा साधनांचा समावेश होतो.
तवारीख म्हणजे तारीख म्हणजेच घटनाक्रम .
झियाउद्दिन बरणी, मौलाना अहमद बिनअहमद, मिर्झा हैदर यांनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहे.
बखर हा शब्द खबर या शब्दापासून आलेला आहे .खबर म्हणजे बातमी
बखर हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे
बखरी मधून तत्कालीन काळातील राजकीय घडामोडी सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती इत्यादी पा कळायला मदत होते.
महिकावतीची बखर ,सभासद बखर ,एक्याण्णव कलमी बखर ,चिटणीसांची बखर ,भाऊसाहेबांची बखर खर्ड्याच्या लढाईतील बखर अशा काही प्रमुख बकरी प्रसिद्ध आहेत.
◆ मौखिक साधने
लॉक अँप परंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या ,दंतकथा, मिथके यातून त्या काळातील लोक जीवनाचे पैलू समजतात.
अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात.
मौखिक साधनांमध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे ,म्हणी, कथा, मिथके या सर्व साधनांचा समावेश होतो
इतिहासाचे लेखन एकदा केले तरी याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहते या संशोधनांमधून नवी साधने नवी माहिती समोर येत असते..
तानाजीचा पोवाडा- या पोवाड्याचा कर्ता तुळशीदास शाहीर आहे.
या पोवाडा मध्ये सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन आहे पोवाड्यात तानाजी, शेलार मामा ,शिवाजी महाराज ,वीर माता जिजाबाई यांची सुंदर स्वभाव चित्रे दिली आहेत.
◆ ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन
वरील सर्व ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते .या सर्व साधनांची विश्वसनीयता तपासावी लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून या साधनांचा दर्जा ठरवावा लागतो.
लेखकांचा खरे-खोटेपणा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ ,राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा ,प्रतीके ,अलंकार यांचाही विचार करावा लागतो .
इतिहासाचा अभ्यास करताना सदैव चिकीत्सा करूनच अभ्यास पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो इतिहासाचा लेखनामध्ये लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थपणा फार महत्त्वाचा अस
चाचणी सोडविण्यासाठी
- ➤ क्लिक करा
Aman kiran sonawane
ReplyDeleteI'm haker
ReplyDeleteNo haker me
ReplyDelete