Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday, 3 August 2020

इयत्ता सातवी भूगोल- 5- वारे -Online Test

5 -वारे -
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा...

वारा -
हवेच्या वाहत्या प्रवाहाला वारा म्हणतात. वाऱ्याचा स्पर्श
आपल्याला जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही .

वाऱ्याची निर्मिती-
पृथ्वीवर हवेचा दाब एक सारखा नसतो.
तो भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतो. जास्त दाबाच्या पट्टयाकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे हालचाल करते.
ही हालचाल क्षितिजसमांतर दिशेमध्ये असते. हवेच्या या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते.

वाऱ्याची गती- 
हवेच्या दाबाच्या खडकांमधील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होत असतो.
हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असतो तेथे वारे मंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक
असेल तेथे वारे हे वेगाने वाहतात.

पृथ्वीचे परिवलन आणि वाऱ्याच्या वाहण्याची दिशा -
पृथ्वीचा परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो.
उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर गोलार्धात वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.
पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेमध्ये बदल होत असतो.

◆ वाऱ्यांचे प्रकार -
वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी आणि व्यापलेला प्रदेश तसेच हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे तीन प्रकार पडतात.
ग्रहीय वारे, स्थानिक वारे ,हंगामी किंवा मोसमी वारे.
बहुतांश वारे हे ते ज्या दिशेने वाहत येतात त्या दिशेच्या किंवा प्रदेशाच्या नावाने ओळखले जातात.
ग्रहीय वारे
पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात.
हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात.
उदाहरण .पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 35 अंश अक्षवृत्तच्या दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टयाकडून  विषयवृत्तीय  कमी दाबाच्या पट्टयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात.
दोन्ही गोलार्धात मध्ये अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडुन 55 ते 65 अंश अक्षवृत्तच्या दरम्यान असलेल्या  उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.
तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्टयाकडून 55 अंश ते 65 अंश अक्षवृत्त च्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे म्हणतात.

स्थानिक वारे 
काही वारे कमी कालावधीत आणि विशिष्ट प्रदेशांमध्ये निर्माण होतात.
यांचे क्षेत्र मर्यादित असते म्हणून या वाऱ्यांना स्थानिक वारे म्हणतात. स्थानिक वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम दिसून येतो .हे वारे निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या नावांनी ओळखले जातात.
★ सूर्योदयानंतर दिवसा दरीतून पर्वताकडे थंड वारे वाहतात या वाऱ्यांना दरीय वारे म्हणतात.
★ सूर्यास्तानंतर रात्री पर्वता कडून दरीकडे थंड वारे वाहतात या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात.
★ दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात त्या वाऱ्यांना सागरी वारी किंवा खारे वारे म्हणतात.
★ रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना भुमिय किंवा मतलई वारे म्हणतात.


वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत हे वारे वाहतात हे वारे स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात.
उदाहरण सिमुम, चिनूक, बोरा, पांपोरा फॉन

●  हंगामी किंवा मोसमी वारे
जमीन आणि पाणी यांच्या ऋतूनुसार कमी-अधिक तापल्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात .
आग्नेय आशिया, उत्तर आस्ट्रेलिया, पूर्वआफ्रिका या प्रदेशावर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम दिसून येतो.
भारतीय उपखंडामध्ये उन्हाळा व हिवाळा या ऋतु वर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव असतो.
मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांच्याव्यतिरिक्त पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू सुद्धा होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारे असतात.
भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश पर्जन्यवृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे होते .हे वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडातकडे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहतात यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात.
या वाऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बाष्पअसते सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत विषयवृत्तीय लगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंड कडून विषयवृत्त कडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात .हे वारे कोरडे असतात.

आवर्त
एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अशावेळी आवर्त वार्‍याची परिस्थिती निर्माण होत असते. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशा मध्ये आवरता चा केंद्रभाग हा 'L' या अक्षराने दाखवतात.
आवर्त प्रणाली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तना आपण वादळ किंवा चक्रीवादळ असे सुद्धा म्हणतो.
कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे हरिकेन्स या नावाने ओळखले जातात. समशीतोष्ण कटिबंधात सुद्धा आवर्त तयार होतात  त्यांची तीव्रता कमी असते.
ती विनाशकारी नसतात.

प्रत्यावर्त
एखाद्या क्षेत्रामध्ये विशिष्ट वातावरणीय परिस्थितीमध्ये केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो.
केंद्र भागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाक हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशामध्ये प्रत्यावर्तचा केंद्र भाग 'H'  या अक्षराने दाखवतात. हे चक्राकार दिशेने वाहत असतात.

चाचणी सोडविण्यासाठी ---    क्लिक करा

No comments:

Post a Comment