Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Sunday, 2 August 2020

इयत्ता सातवी भूगोल ४- हवेचा दाब -Online Test

हवेचा दाब
वातावरणातील हवेचा दाब पडतो.
हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ यासारख्या अनेक घडामोडी होतात व त्यांची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.

●हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो.
प्रदेशाची उंची ,हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात.

प्रदेशाची उंची व हवेचा दाब
 हवेतील धूलिकण, बाष्प ,जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठ लागत जास्त असते.
उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होत जाते म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.

तापमान व हवेचा दाब
तापमान व हवेचा दाब यांचा फार जवळचा संबंध आहे.
ज्या ठिकाणी तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो.
जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते
आणि हलकी होते .
जमिनी लगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे त्या प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.

तापमानपट्टे व हवादाबपट्टे
तापमान पट्टे आणि हवा दाब पट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो.
तापमान पट्टे यांचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असतो तर हवा दाब पट्टे यांचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित म्हणजे कमी असतो. तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावर होतो त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी दाबाचे तसेच हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात.

भूपृष्ठावरील हवादाबपट्टे
सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता ही एक सारखी नसते ,ती असमान असते. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमान असते. त्यामुळे पृथ्वीवर प्रथम तापमान पट्टे म्हणजेच कटिबंध निर्माण होतात तापमान पट्टेच्या पार्श्वभूमीवर हवादाबपट्टे यांची निर्मिती होते.

विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा
0° ते 5° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे :
उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते. त्यामुळे पृथ्वीवरील उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.

उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे :
उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात ५५° ते ६५° अक्षवृत्ताच्या दरम्यान उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे तयार होतात.

ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे :
उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात ८०° ते ९०° या अक्षदृत्ताच्या दरम्यान ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे दिसून येतात.

हवादाबपट्ट्यांचे आंदोलन :

(१).सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते.
(२) त्याचा परिणाम तापमानपट्ट्यांवर अवलंबून असलेल्या हवादाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात ५° ते ७° उत्तरेकडे व दक्षिणायनात ५° ते ७° दक्षिणेकडे असा असतो.
(३) यालाच हवादाबपट्ट्यांचे आंदोलन म्हणून ओळखले जाते.

तापमानपट्टे व हवादाबपट्टे यांतील महत्त्वाचा फरक :
(१) तापमानपट्टे व हवादाबपट्टे यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे तापमानपट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही धुरुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात.
(२) हवादाबपट्टे सलग नसून ते कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे यांनुसार विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळया भागांत आढळतात.

◆ हवेच्या दाबाचे परिणाम :
(৭) हवेच्या दाबामुळे वाच्यांची निर्मिती होते.
(२) हवेच्या दाबामुळे वादळांची निर्मिती होते.
(३) हवेच्या दाब उंची मोजण्यासाठी उपयुक्त असतो.
(४) हवेच्या दाबामुळे आरोह पर्जन्याची निर्मिती होते.
(५) हवेच्या दाबामुळे सजीवांच्या श्वसनक्रियेवर परिणाम होतो.

खंड व महासागर या भागांतील समदाब रेषांची दिशा :
उत्तर गोलार्धात  जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धात बहुत
समदाब रेषा महासागरातून खंडांकडे जाताना नैऋत्य दिशेकडून ईशान्य दिशेत वळताना दिसतात. उत्तर गोलार्धात समदाब रेषांमधील अंतरही खंडांवर कमी-जास्त असल्याचे आढळते. दक्षिण गोलार्धात महासागरांचे (पाण्याचे) प्रमाण
तुलनेने जास्त आहे. त्यामुळे दक्षिण गोलार्धात बहुतांश रेषा या अक्षवृत्तांना समांतर आढळतात. दक्षिण गोला
समदाब रेषांमधील अंतरही तुलनेने जवळजवळ समान असल्याचे आढळते.

◆ समदाब रेषा
समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात, त्या रेषेला समदाब
रेषा म्हणतात.


इयत्ता सातवी- भूगोल 
४- हवेचा दाब 
चाचणी सोडविण्यासाठी -- ➤➤  क्लिक करा

No comments:

Post a Comment