3-धार्मिक समन्वय
खालील ठळक मुद्दे यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा
●भारतीय समाजाचे भाषा आणि धर्म यामध्ये विविधता असणे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
●भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्व स्वीकारलेले आहे.धार्मिक समन्वय याचा प्रयत्न करण्यासाठी समाज जीवनामध्ये अनेक प्रयत्न झाले यापैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि पंथ यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे .
ईश्वरभक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वय यावर भर या काळामध्ये दिला गेला आहे.
●भारतीय धर्म जीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता.
● मध्ययुगामध्ये हे दोन्ही मार्ग मागे पडले आणि भक्तिमार्ग खास महत्त्व आले .
◆भक्ती चळवळ
भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतामध्ये झाला असल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या होत्या. ●नायनार हे शिवभक्त होते तर आळवार हे विष्णू भक्त होते.
●शिव आणि विष्णू हे एकच आहेत असे म्हणून यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्न झाले.
● अर्धा भाग विष्णूचा व अर्धा भाग शिवाचा असे दाखवून हरिहर या स्वरूपातली मूर्ती निर्माण करण्यात आली
या भक्ती चळवळीमध्ये सर्व स्तरातील लोक सहभागी झाले.
● उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले.
● संत कबीर भक्ती चळवळ केली एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्रे, मूर्ती पूजा यांना महत्त्व दिले नाही .जातिभेद, धर्मभेद हे सुद्धा मांडले नाही.
![]() |
संत कबीर |
त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दांमध्ये फटकारले होते.
● बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्तीचे महत्व सांगितले.
चैतन्य महाप्रभूचा प्रभाव आणि शंकरदेव यांनी आसाम मध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला.
● गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे एक प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले .
ते निस्सीम कृष्णभक्त होते त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानले जाते.
● संत मीराबाई
संत मीराबाई यांनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्याचा त्याग करून त्यांनी कृष्णभक्तीत तल्लीन होण्याचे ठरवले.
● राजस्थानी व गुजराती भाषा मध्ये त्यांनी भक्तीच्या रचना केल्या.
● संत रोहिदास हे सुद्धा एक प्रभावी संत होऊन गेले संत सेना हे सुद्धा समतेचा आणि मानवतेचा संदेश देऊन गेले.
●हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले.
● संत तुलसीदास यांचे रामचरित मानस या ग्रंथांमध्ये रामभक्तीचे सुंदर अविष्कार आढळून आलेले आहेत.
◆ कर्नाटक मध्ये बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला.
जातिभेदाला त्यांनी तीव्र विरोध केला.
श्रमप्रतिष्ठा चे महत्व सांगून 'काय कवे कैलास' हे प्रसिद्ध वचन त्यांनी समाजाला दिले.
या चळवळींमध्ये त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले.
अनुभवमंटप या सभागृहांमध्ये होणाऱ्या धर्म चर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले.
● बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत.
त्यापैकी मनमत स्वामी यांनी लिहिलेल्या परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
◆ महानुभव पंथ
इसवी सनाच्या तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला.
हा पंथ कृष्णभक्ती चा उपदेश करणारा आहे.
श्री गोविंद प्रभु हे चक्रधर स्वामींचे गुरू होते.
● चक्रधर स्वामींच्या शिष्यांमध्ये सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांचा समावेश होता. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून मराठी भाषेमधून उपदेश केला.
![]() |
श्री चक्रधर स्वामी |
● संस्कृत ऐवजी त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती सुद्धा त्यांच्यामुळे झाली.
विदर्भातील ऋद्धिपुर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय.
◆ गुरुनानक
गुरुनानक हे शिखांचे धर्मसंस्थापक पहिले गुरु होते. धार्मिक समन्वय याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला.
हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. ते मक्केला सुद्धा जाऊन आले.
● सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती.
गुरुनानक यांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले.
त्यांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली.
![]() |
गुरुनानक |
● गुरुनानक यांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात.
गुरु ग्रंथसाहिब हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.
या ग्रंथात स्वतः गुरुनानक ,संत नामदेव ,संत कबीर इत्यादींच्या रचना आहे .
गुरुनानक नंतर शिखांचे गुरु झाले गुरुगोविंद सिंग.
हे शीख धर्मातील दहावे गुरू होते .
त्यांच्यानंतर सर्व शीख गुरुगोविंदसिंग यांच्या आज्ञेप्रमाणे गुरुग्रंथसाहेब या धर्माच्या आचरणाने या धर्माला ग्रंथाला गुरु मानू लागले.
◆ सूफी पंथ
इस्लाम मधील सूफी हा एक महत्त्वाचा पंथ . परमेश्वर प्रेमळ आहे.
● प्रेम आणि भक्ती मार्गांनी परमेश्वरापर्यंत पोहोचता येते,अशी त्यांची श्रद्धा होती.
या पंथांमध्ये सर्व प्राणीमात्रावर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावं, साधेपणा राहावे अशा प्रकारची शिकवण होती.
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती, शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर संत होऊन गेले.
सूफी संतांच्या या उपदेशामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ऐक्य निर्माण झाले.
● भारतीय संगीतामध्ये सूफी संगीत या परंपरेची एक मोलाची भर पडलेली आहे.
सर्व संतांनी सांगितलेल्या भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरणास सोपा होता.
सर्व स्त्री-पुरुष या भक्ती चळवळीमध्ये सहभागी होऊ शकत होते.
संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते सहज समजू लागले आणि जवळचे वाटले.
●भारतीय संस्कृतीची जडणघडण झाली. तिच्यामध्ये या भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे.
इयत्ता सातवी-इतिहास
ReplyDelete