6 - नैसर्गिक प्रदेश
खालील ठळक मुद्यांचे काळजीपूर्वक वाचन करा व सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
★ पृथ्वीवरील स्वरूपे हवामान व मृदा या मधील भिन्नता
पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भूस्वरूपे,हवामान मृदा याबाबतीत भिन्नता आढळून येते.
ही भिन्नता प्रमुख्याने त्या भागात उपलब्ध असणाऱ्या सूर्यप्रकाश व पाणी या घटकावर अवलंबून असते.
सूर्यप्रकाश व प्राणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. भुरुपे ,हवामान ,मृदा या तीन घटकातील बदलांचा वनस्पती ,प्राणी तसेच मानवी जीवन यावर प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे जैवविविधतेत बदल होत असतो.
◆ नैसर्गिक प्रदेश -
पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडामध्ये विशिष्ट अक्षवृत्ता च्या दरम्यान हवामान, वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्यामध्ये साधर्म्य आढळते व त्यामुळे त्या प्रदेशाचा वेगळेपणा जाणून येतो हे प्रदेश नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात म्हणून या प्रदेशांना नैसर्गिक प्रदेशात असे म्हणतात.
अशा नैसर्गिक प्रदेशातील पर्यावरणाचा मानवासह इतर सर्व सजीव व सजीव सृष्टी वर परिणाम होतो.
◆ विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंतचे नैसर्गिक प्रदेश
● टुंड्रा प्रदेश
टुंड्रा प्रदेश सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्त त्याच्या दरम्यान असतो.
या प्रदेशात अतिशय थंड हवामान आढळते.
या प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात .
टुंड्रा प्रदेशात रेनडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, वॉलरस मासे इत्यादी प्राणी आढळतात.
या प्रदेशामध्ये लोकसंख्या अति विरळ असते.
● तैगा प्रदेश-
हा प्रदेश सुमारे 55° ते 65° उत्तर अक्षवृत्त च्या दरम्यान असतो.
या प्रदेशात उन्हाळ्यात पाऊस व हिवाळ्यात हिमवृष्टी होते.
या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात या प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर दाट आणि मऊ केस असतात.
या प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
● गवताळ प्रदेश (स्टेप्स व प्रेअरी)
हा प्रदेश सुमारे 30° ते 55° उत्तर व दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागांमध्ये आढळतो.
या प्रदेशात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात.
या प्रदेशात प्रामुख्याने तृणभक्षक प्राणी आढळतात. पशुपालन हा या प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गव्हाची शेती केली जाते.
● उष्ण वाळवंटी प्रदेश
हा प्रदेश विषुववृत्तापासून 20° ते 30° उत्तर व दक्षिण अक्षवृत्त च्या दरम्यान आहे.
या प्रदेशात दिवसा अतिशय उष्णता असते व रात्री खूप थंडी पडते.
या प्रदेशात अत्यल्प पर्जन्य पडतो.
या प्रदेशात प्रामुख्याने कमीत कमी पाणी असलेल्या आणि काटेरी वनस्पती आढळतात.
उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा प्राणी आढळतो.
या प्रदेशातील लोक आपल्या अनेक गरजा जनावरापासून पूर्ण करतात.
● गवताळ प्रदेश ( सुदान )
हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5° ते 20° अक्षवृत्त च्या दरम्यान आहे.
या प्रदेशातील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो.
या प्रदेशांमध्ये प्रामुख्याने उंच व दाट गवत आढळते. या प्रदेशात व मांसभक्षक प्राण्यांची विपुलता आढळते.
शिकार करणे आणि पशुपालन करणे हे या प्रदेशातील लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत.
● विषुववृत्तीय प्रदेश
हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 0° ते 5° अक्षवृत्त यांच्या दरम्यान आहे.
विषुववृत्त प्रदेशात उष्ण व दमट आणि रोगट हवामान आढळते.
या प्रदेशात घनदाट सदाहरित वने असतात.
या प्रदेशातील प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते.
विषुववृत्तीय प्रदेशात कमी लोकवस्ती आढळते.
◆ स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे दिसणारे प्रदेश
● मोसमी प्रदेश
हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 10° ते 30° अक्षवृत्त च्या दरम्यान आहे.
या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठरावीक ऋतूमध्ये पाऊस पडतो.
या प्रदेशात पानझडी व निम सदाहरित वने आढळतात.
या प्रदेशांमध्ये विविध वन्य प्राणी व पक्षी तसेच पाळीव प्राणी आढळतात. या प्रदेशात लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते . मोसमी प्रदेशाचे स्थान हे विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 10 ते 30° अक्षवृत्त च्या दरम्यान असते. आणि या प्रदेशामध्ये प्रामुख्याने भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडीज, उत्तर आस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका,मध्य अमेरिका इत्यादी विभागांचा त्यामध्ये समावेश होतो.
मोसमी प्रदेशांमध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात.
प्रामुख्याने वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकड ,साप इत्यादी प्राणी येथे आढळतात. याचबरोबर गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे पाळीव प्राणी सुद्धा आढळतात. याशिवाय मोर, कोकीळ इत्यादी वन्य पक्षी सुद्धा आढळतात.
● भूमध्य सागरी प्रदेश
हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 30° ते 40 अंश अक्षवृत्त च्या दरम्यान आहे.
या प्रदेशात उन्हाळे अतिशय कोरडे असतात आणि हिवाळ्यात खूप पाऊस पडतो.
या प्रदेशात जाड सालाचीझाडे आढळतात .
कमी पावसाच्या भागांमध्ये गवत हे पीक आढळते. तसेच पर्वतीय भागात सूचिपर्णी वनस्पती आढळतात.
या प्रदेशात पाळीव प्राणी खूप मोठ्या संख्येने आढळतात.भूमध्य सागरी प्रदेश यामध्ये प्राचीन काळी ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला आहे. भूमध्य सागरी प्रदेशांमध्ये प्रामुख्याने आढळणारी वृक्ष चेस्टनट इत्यादी आहेत.
कमी पावसाच्या भागात गवत वाढते आणि अशा पर्वते भागांमध्ये सूचीपर्णी वनस्पती आढळतात मानवी जीवन भूमध्य सागरी प्रदेशात लोकांचा आहार प्रमुख्याने गव्हापासून बनवलेले विविध पदार्थ हा असतो.
या प्रदेशातील लोक रंगीबेरंगी कपडे परिधान करतात.
● पश्चिम युरोपीय प्रदेश
हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 45 ते 65 अक्षवृत्त च्या दरम्यान आहे.
पश्चिम युरोपीय प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. येथील हवामान सौम्य असते.
या प्रदेशात वर्षभर हिरवेगार गवत आढळते. झाडांच्या पानांची हिवाळ्यामध्ये गळती होते.
पश्चिम युरोपीय प्रदेशात पाळीव प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.
या प्रदेशातील लोक उत्साही व उद्योगी असतात.
या प्रदेशांमध्ये द्वितीय व तृतीय व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आढळतात.
● खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येणारे प्रदेश
पृथ्वीवरील काही प्रदेश हे तेथील विशिष्ट स्थानामुळे वेगळे दिसून येतात.
उदाहरण- चीनी प्रदेश, सेंट लॉरेन्स प्रदेश इत्यादी.
◆ नैसर्गिक प्रदेश व व्यवसायामधील विविधता-
● मान्सून प्रदेश
मान्सून प्रदेशांमध्ये शेती व शेतीला पूरक व्यवसाय केले जातात.
● विषुववृत्तीय प्रदेश
विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये उत्पादनावर आधारित लाकूड कटाई व डिंक,रबर ,लाख इत्यादी वनस्पतीजन्य पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केले जातात.
● तैगा प्रदेश
ऐका प्रदेशातील वनांमध्ये मौज लाकूड आढळते. त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने लाकूडतोड हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो.
● टुंड्रा प्रदेश
टुंड्रा प्रदेशात केवळ शिकार व मासेमारी हे व्यवसाय केले जातात.
●गवताळ प्रदेश
गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेतीचा व्यवसाय केला जातो.
◆ नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर -
पृथ्वीवर वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती यामध्ये फरक आढळून येतो.
नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा त्या-त्या प्रदेशातील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास तसेच सांस्कृतिक जडणघडण यांचा सुद्धा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर तसेच लोक जीवनावर प्रभाव पडत असतो.
◆ वसुधैव कुटुम्बकम-
नैसर्गिक साधन संपत्तीवर केवळ मानवाचे नाही तर पृथ्वीवरील इतर सर्व सजीवांचे जीवन अवलंबून असते त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्या बरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे गरजेचे आहे.तरच वसुधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल.
चाचणी सोडविण्यासाठी -- क्लिक करा

No comments:
Post a Comment