■ 5 - स्वराज्य स्थापना
◆ खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि आणि सर्वात खाली या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
● सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व जन्माला आले. त्यांनी येथील राजसत्तांना आव्हान दिले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके 1551( फाल्गुन वद्य तृतीया) म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवरायांचे वडील शहाजीराजे आणि आई राजमाता जिजाबाई यांनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. बालपणापासून संस्कार दिले.
● शहाजीराजे हे निजामशाहीचे सरदार होते.
मोगल आणि आदिलशहा यांनी निजामशाहीचा पाडाव केला आणि शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाही चे सरदार झाले.
शहाजी राजे यांच्याकडे सुपे, इंदापूर,चाकण व पुणे हे परगणे देण्यात आले. आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळुरू व त्याच्या आसपासचा प्रदेश सुद्धा जहागीर म्हणून मिळाला.
● शहाजी राजे हे पराक्रमी धैर्यशील, बुद्धिमान आणि राजनीतिज्ञ होते ,ते उत्तम धनुर्धर सुद्धा होते. तलवार चालवणे, पट्टा चालवणे, भाला चालवणे यामध्ये ते पटाईत होते.
जिजामाता यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे येथील मातब्बर सरदार होते.लहानपणी त्यांना विविध विद्या, लष्करी शिक्षण मिळाले होते.
![]() |
राजमाता जिजाबाई |
शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांनी सुद्धा शहाजीराजांना प्रोत्साहन देऊन सहाय्य केले होते.
स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केलं प्रेरणा दिली. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडविण्यासाठी, न्यायनिवाडे करण्यासाठी त्या शिवरायांना मदत करत असत.
● शिवरायांना उत्तम शिक्षण मिळावं त्याचबरोबर शील. सत्यप्रियता, वाक्चातुर्य ,दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग ,विजय, आकांक्षा स्वराज्यस्वप्न इत्यादी बाबींचे संस्कार सुद्धा त्यांच्यावर केले.
◆ शिवरायांचे सहकारी
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.
मावळ हा भाग म्हणजे सध्याचा पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग. या मावळ प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात केला. शिवरायांचे सोबती येसाजी कंक ,बाजी पासलकर बापूजी मुदगल,येरेकर देशपांडे, बंधू कावजी कोंढाळकर जिवा महाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे ही यातील काही नावे होय. शिवरायांच्या या सहकाऱ्यांना मावळे असे म्हणत असत.
◆ राजमुद्रा
स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये शिवरायांचे जे ध्येय होते ते राजमुद्रेवर वरून स्पष्ट समजत होते.
या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।॥।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
● राजमुद्रे वरील शब्दांचा अर्थ
शहाजीचा पुत्र शिवाजीयाचीप्रतिपदेच्या
चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे असे मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते.
मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे या मधून वडिलांविषयी कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारित जाईल हा विश्वास, म्हणजेच पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, त्याचबरोबर प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केले आहे.
◆ स्वराज्यस्थापनेच्या हालचाली
शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या ताब्यात नव्हते ते आदिलशाहीच्या ताब्यात होते
ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती त्याकाळी होती.
![]() |
पन्हाळा किल्ला |
आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले किल्ले ताब्यात घेणे म्हणजे आदिलशाही सत्तेला आव्हान देणे होते. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्यांनी किल्ल्याचे नाव राजगड ठेवले.
राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती.
![]() |
राजगड |
◆ जावळीचा ताबा
सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये त्याने विरोध दर्शवला. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये जावळीवर स्वारी केली आणि तो प्रदेश जिंकून घेतला.
जावळी ची प्रचंड संपत्ती स्वराज्याच्या हाती पडली. या विजयानंतर कोकणामधील हालचाली वाढल्या. जावळी खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला आणि या विजयामुळे शिवरायांचे सामर्थ्य वाढले.
◆ अफजलखानाचे पारिपत्य
शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले जिंकायला सुरुवात केली होती.
जावळीचे मोरे यांचा विरोध मोडून काढला होता. यावेळी आदिलशाहीला मोठे आव्हान उभे झाले होते.
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला जावा असे आदिलशहाला वाटत होते म्हणून त्याने अफजलखान या बलाढ्य आणि अनुभवी सरदारास शिवाजी महाराजावर चालून जाण्यास सांगितले.
अफजलखान विजापुराहून वाई याठिकाणी आला. त्याला वाई प्रांताची माहिती होती. वाई जवळ असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली या भेटीमध्ये अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला,परंतु शिवाजी महाराजांनी अतिशय शिताफीने त्याला ठार मारले आणि आदिलशहा सैन्याचं पारिपत्य केलं.
◆ अफझलखानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली.ज्यांनी या लढाईमध्ये चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली.
अफजलखानाच्या सैन्यामधील जे सैनिक अधिकारी त्यांच्या हाती लागले होते त्यांना शिवाजी महाराजांनी चांगली वागणूक दिली.
◆ सिद्धी जोहरची स्वारी
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले.
➧ खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहर या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.
त्याला सलाबतखान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीला रुस्तुम इमान, बाजी घोरपडे, आणि अफजल खानाचा मुलगा फाजलखान हेसुद्धा होते.
या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला.
सुमारे पाच महिने सिद्दींच्या सैनिकांचा पन्हाळ्याचा वेढा पडला होता आणि या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर पडणे कठीण झाले होते.
नेतोजी पालकर यांनी बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने तो यशस्वी होऊ शकला नाही.शेवटी शिवाजी महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली त्यामुळे सिद्दीने पन्हाळगडा दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता आणली आणि याचा फायदा शिवाजीमहाराजांना झाला.
याप्रसंगी गडावर शिवा काशीद या बहादूर तरुणांने पुढाकार घेतला.
तो दिसायला शिवरायांसारखा होता. त्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राज दिंडी दरवाजातून बाहेर पडली. सिद्दीच्या सैन्यांनी ही पालखी पकडली.
प्रसंग खूप अवघड होता. शिवा काशिद याने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान दिले.
याच दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या वाटेने गडाच्या बाहेर पडले.त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह अनेक निवडक सैनिक होते.
शिवाजीमहाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले ही बातमी सिद्दी जोहरला समजली त्याने शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यासाठी सैन्य पाठवले.
शिवाजी महाराजांचा पाठलाग करणाऱ्या सैन्यांना थोपवण्याची जबाबदारी बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने वर सोपवली.
● बाजीप्रभू देशपांडे यांनी गजापूर जवळील घोडखिंडी मध्ये सिद्धी जोहरच्या सैन्यास आडवले बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली, परंतु सिद्दीच्या सैन्यांना घोडखिंड पार करू दिली नाही.
शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले तेव्हा बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले.
बाजीप्रभू ला घोडखिंडी मध्ये वीरमरण आले.
चाचणी सोडविण्यासाठी-- क्लिक करा
No comments:
Post a Comment