8 - विरामचिन्हे अभ्यास आणि चाचणी
1. पूर्णविराम [ . ]
पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात. मी दररोज शाळेत जातो.
2 अर्धविराम [ ; ]
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी गड आला; पण सिंह गेला.
जोडतात, तेव्हा वापरतात.
3. अपूर्णविराम [ : ]
वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरावा.
4. स्वल्पविराम [ , ]
1) एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात.
(1) गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी,गोदावरी या भारतातील नद्या आहेत.
(2) हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे वापरतात. श्यामल, पुस्तक दे.
5. प्रश्नचिन्ह ( ? )
वाक्यात प्रश्न विचारला असेल, तर वाक्याच्या शेवटी वापरतात.
तू कोठे गेला होतास?
6. उद्गारचिन्ह [ ! ]
मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात.
बापरे! केवढा मोठा हा हत्ती!
7. अवतरणचिन्ह
(1) एकेरी- ( ' )
एखादया शब्दावर जोर देताना किंवा दुसर्याचे मत सांगताना वापरतात.
1) गांधीजींनी 'चले जाव' ही घोषणा दिली
(2) दुहेरी ( " " )
बोलणाच्याच्या तोडचे शब्द दाखवताना वापरतात
शरद म्हणाला, "मी सहलीला येईन."
৪. संयोगचिन्ह ( - )
दोन शब्द जोडताना वापरतात. ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना.
(1) आई-वडील.
(2) उदा., महाराष्ट्रात अनेक बोली
भाषा बोलल्या जातात.
9. अपसारण ( - )
वाक्याच्या पुढे तपशील दयायचा नसल्यास अपसारणचिन्ह वापरतात.
महाराज तुमचा राजवाडा जळून-
10. अवग्रह (ss )
एखादधा वर्णाचा लांब (दीर्घ) उच्चार करताना वापरतात.
11 काकपद
लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खूण
No comments:
Post a Comment