४- नव्या युगाचे गाणे
चाचणी सोडविण्यासाठी - Click Here
कविता थोडक्यात समजून घेवूया
अणुरेणूच्या अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटत आहे - 'जन हो, चला, चला पुढे चला.' विज्ञानाचे तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरलेले आहे. त्याची तेजस्वी आभा सर्वत्र दिसते आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हांला आली आहे.मनामनात खोलवर असलेली अस्वस्थतेची ,अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे; कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग नवा सूर्य सापडला आहे.नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज अवतरले आहे. माणुसकीच्या मार्गावर द्वेषाच्या नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजिवीतेची, अमरत्वाची फुले वेचून ती एकत्र.गुंफून आपण एकात्मतेची माळ तयार करूया.
आता उदासपणा नको, देन्यदारिद्रय नको. या खिन्नतेच्याअंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा,प्रगतीचा प्रकाश दाहीदिशांत झळकतो आहे. देन्याच्याअंधाराला चिरणारा लढा मनामनात फुलतो आहे.रक्तारक्तात नवीन जोश, नवीन उत्साह उसळत आहे.नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. या उज्ज्वल विज्ञानयुगातील अणुरेणूतून शब्द प्रकटत आहे. लोकहो, पुढे चला, प्रगती करा.नवी उमेद भरुया.
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_61.html
ReplyDelete