Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 1 August 2020

इयत्ता सातवी सा.विज्ञान ५- अन्न पदार्थाची सुरक्षा Online Test

 ५-अन्न पदार्थाची सुरक्षा
खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचा आणि सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा..

● शरीराच्या योग्य वाढीसाठी वाढीसाठी आवश्यक असे अन्नघटक म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे  पाणी इत्यादी.

●हे घटक ज्या पदार्थातून मिळतात ते जर खराब किंवा किडलेले असतील, तर त्यास अन्नबिघाड म्हणतात

अन्नबिघाड (Food Spollage) :
 अन्नपदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये बदल होणे व त्यामधील पोषक घटक नाश होणे म्हणजेच 'अन्नबिघाड' होय.

अन्नबिघाडास कारणीभूत घटक :

● नैसर्गिक कारणे : फळे किंवा फळांच्या साली काळपट पडणे, कडवट किंवा घाणेरडा वास येणे.असे पदार्थ खाण्यासाठी अयोग्य असतात. असे सर्व बदल अंत:स्थ घटकांमुळेच होतात.

● मानवनिर्मित कारणे :
मानवी प्रक्रियेमुळे बिघाड. उदा., अति शिजवणे, ओलसर जागी ठेवणे
अयोग्य पद्धतीने साठवण करणे यांमुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. वाहतूक करताना खराब होणे, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादी.

● अन्न पदार्थांचे गुणधर्म :
काही अन्नपदार्थ, उदा., दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारियुक्त
असे पदार्थ लवकर बिघडू शकतात.

● रासायनिक प्रक्रिया :
काही अन्नपदार्थ धातूशी संपर्कात येतात आणि रासायनिक प्रक्रियेमुळे खराब होतात.

● सूक्ष्मजीव व कीटक :
सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघाड होतो.
हे सूक्ष्मजीव हवा, पाणी, जमीन यांमध्ये असतात.
●बिघाड झालेले अन्न खाल्ल्याने रोग होतात आणि प्रकृती बिघडते. आपले अन्न चांगले व उत्तम दर्जाच असले पाहिजे.

अन्न वाया जाणे टाळणे
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारची अन्नघान्ये, फळे, भाज्या, मत्स्
दूथ व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे.
तरीसुद्धा आपल्या देशात व संपूर्ण जगात उपासमार आहे. काही लोकांना एक वेळचे जेवण
अशा परिस्थितीत अन्न वाया जाते, ते टाळले पाहिजे.

संख्यात्मक अन्न नासाडी
चुकीच्या पद्धतीने शेती करणे.
उदाहरणार्थ, मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे, अयोग्य साठवणे
वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर करणे.
पंगती सारख्या पारंपरिक परंतु अनावश्यक जेवण पद्धती.
पंगतीत अन्न आग्रह करून अन्न वाढणे. यांमुळे संख्यात्मकरीत्या अन्ननासाडी.

गुणात्मक अन्न नासाडी (Qualitative Wastage of Food):
अन्न रक्षण करताना अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे. परिरक्षकांचा अतिरेकी वापर करने
अन्न अति प्रमाणात  शिजवणे. भाज्या चिरून नंतर धुणे. नाशवंत फळांची (द्राक्षे, आंबे) अयोग्य हातळणी
अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे.

नासाडी टाळण्यासाठीचे उपाय :
आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न ताटात वाढून घेऊ नये.
ताटात वाढून घेतलेले सर्व पदार्थ संपवणे.
उरलेले अन्न टाकू नये, योग्य पद्धतीने साठवून ते पुन्ह वापरणे
जास्त वेळ अन्न शिजवू नये.
आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा.
अधिक खरेदीचा मोह टाळावा.
अन्न पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा.
उदा., फळे, भाज्या, दूध
, बाटल्यांमधील खाद्यपदार्थ वापरण्याअगोदर त्यावरील तारीख पाहून घेणे व त्यानुसार वापर करावा.

जागतिक अन्न सुरक्षा दिन
1) 16 ऑक्टोबर हा दिवस अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो
2) अन्नसुरक्षा करणे व अन्ननासाडी टाळणे या दोन बाबींविषयी लोकांत जाणीव व्हावी, यासाठी जागतिक
अन्नसुरक्षा दिन साजरा केला जातो.


अन्नसाठवण व सूरक्षा (Food Storage and Preservation) :

अन्न साठवण्याच्या निरनिराळ्या पद्धती असतात. उदा., अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळवणे,
हवाबंद डब्यात ठेवणे इत्यादी. या पद्धतीमुळे अन्नपदार्थांत सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही व ते खराब होत नाहीत.

अन्नरक्षण व परिरक्षण :
(1) अन्नरक्षण : अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण होय. वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढ्न
ते खराब होणे, कीड लागणे यांपासून अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय योजले जातात.
(2) अन्नपरिरक्षण : वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर करून अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड
रोखणे या पद्धतीला अन्नपरिरक्षण असे म्हणतात. यामुळे अन्न दीर्घकाळ टिकवले जाते.

◆ अन्नसुरक्षा  बाबत कोण काय करते ?
अन्न अणि औषध प्रशासन (FDA) ही शासकीय यंत्रणा आहे. अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करुन त्यावर नियंत्रण ठेवते.

अन्न रक्षण पद्धती

(1) गोठणीकरण : घरातील शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) उपयोग करून अन्न साठवले जाते.
 कमी तापमानाला अन्नपदार्थांतील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकून राहू शकतात.
(2) धुरीकरण : अन्न संरक्षित राहण्यासाठी त्याला धूर दिला जातो. यासाठी अॅल्युमिनिअम फॉस्फॉइड याचा  वापरतात.
(3) कीटकनाशकांचा वापर करणे : अन्नरक्षणासाठी अनेक कीटकनाशके आहेत. पोत्यांत धान्य भरून त्यावर
मेलॅथऑनचा फवारा मारतात.

◆अयोग्य साठवण

किरणीयन :
आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा अन्नपदार्थांवर केला जातो.
उदा. उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन ,त्वरकांद्वारा (अॅक्सिलरेटर) निर्मित क्ष-किरण व किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण. यामुळे अन्न खराब करणाऱ्या सजीवांचा नाश होतो.

● वायूचा वापर :
नायट्रोजन वायूचा उपयोग करून अन्नातील कीटक व बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो.
उदा., वेफर्स व इतर खादयपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना अशा वायूचा वापर केला जातो.

●  परिरक्षकांचा वापर :
() नैसर्गिक परिरक्षक :
 निसर्गतः उपलब्ध असणारे पदार्थ : उदा., मीठ, साखर, तेल इत्यादी.
() रासायनिक परिरक्षक : उदा., अँसेटिक आम्ल (व्हिनेगर), सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट,

 ◆ पाश्चरीकरण :
 पाश्चरीकरण पद्धतीने दूघ किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यत
 उदा., दूध 80° C ला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते. ही पद्धत लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी विकसित केली.

◆  अन्नभेसळ :

(1) अन्नभेसळ अशीही होते-
●अन्नपदार्थांतील काही महत्त्वाचे घटक काढल्यानंतर ग्राहकाला विकणे.
●अन्नपदार्थांत अपायकारक रंगांचा वापर किंवा अपायकारक पदार्थ मिसळणे.
●कमी प्रतीचा, स्वस्त किंवा अखाद्य पदार्थ चांगल्या अन्नात मिसळणे.

(2) अन्नभेसळीचे परिणाम :
 भेसळयुक्त अन्नामुळे आरोग्याला धोका पोहोचतो.
(3) अन्नभेसळ ओळखण्याचे उपाय
दूध, मिरची पावडर, हळद आणि रवा यांची अन्नभेसळ ओळखण्यासाठी काही उपाय आहेत.
(4) लोकसभेने अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा 1954 मध्ये संमत केला। यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून
1976 मध्ये कायद्यातील तरतुदींनुसार अपायकारक पदार्थांची भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे.

कायद्यातील तरतुदी
(अ) अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी.
(ब) अन्नपदार्थांवरील वेष्टन
अन्नाला व औषधाला घातक नसावे
(क) वेष्टनावर निर्मितीचा दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात.

अन्नभेसळीचे प्रयत्न :
फळांना रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन देऊन त्यांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवतात.
दूधविक्रेते दुधात युरिया मिसळून दुधाची स्निग्धता वाढवतात.
विक्रेते कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावरची 'एक्सपायरीची दिनांक' बदलतात. त्यामुळे त्यांचे नुकसान कमी होते पण ग्राहकाला मोठा धोका निर्माण होतो.


इयत्ता सातवी -- सामान्य विज्ञान
पाठ  ५ - अन्न पदार्थाची सुरक्षा 
चाचणी सोडविण्यासाठी-- ➤ ➤ क्लिक करा

No comments:

Post a Comment