Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 1 August 2020

इयत्ता सातवी सा,विज्ञान ४- सजीवांतील पोषण Online Test

4 - सजीवांतील पोषण 
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.   

पोषण (Nutrltion) :

(1) पोषण : पोषकद्रव्ये अन्नातून शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.
(2) अन्नपदार्थ : ज्या पदार्थांचे पचन (Digestion) आणि सात्मीकरण (Assimilation) होऊन ऊर्जा प्राप्त होते,
त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. 
आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व शरीर निरोगी राखण्यासाठी असे पोषक पदार्थ आवश्यक असतात.
(3) पोषकद्रव्ये : विविध प्रकारचे अन्नघटक म्हणजेच पोषकद्रव्ये होत. ही मुख्यत्वे दोन प्रकारची आहेत :
* बृहत् पोषकद्रव्ये (Macro Nutrients) उदा., कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ. यांची शरीराला खूप  मोठ्या
प्रमाणात आवश्यकता असते.

* सूक्ष्म पोषकद्रव्ये (Micro Nutrients) उदा., खनिजे, क्षार व जीवनसत्त्वे. यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते.
* सजीवांच्या शरीरात पोषणासाठी जीवनप्रक्रिया अखंडपणे सुरू असतात.
(4) पोषणाची गरज :
* शरीराला कार्य करण्यासाठी सतत ऊर्जापुरवठा करणे आणि वाढ व विकास करणे यासाठी पोषणाची गरज असते 
* पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे.
* रोगप्रतिकारशक्ती निर्माण करून शरीराला रोगांपासून वाचवणे यासाठी .
(5) स्वयंपोषण (Autotrophlc Nutrition) : 
ज्या वेळी सजीव स्वत:चे अन्न स्वतः तयार करून, स्वतःचे पोषण त्यातून करतात, तेव्हा त्याला स्वयं पोषण म्हणतात.
(6) परपोषण (Heterotrophic Nutrition)
जेव्हा सजीव पोषणासाठी इतर वनस्पती किंवा प्राणी अशा सजीवांवर अवलंबून राहतात, तेव्हा त्या पोषणपद्धतीला परपोषण म्हणतात.
2, वनस्पतीतील पोषण (Nutrition In Plants) :

(1) स्वयंपोषी वनस्पती (Autotrophic Plants) :

वनस्पतीला  निरविराळया शरीर क्रिया साठी अन्न तयार करत असतात 
(2) प्रकाश-संश्लेषण (photosynthesis)
* जमिनोतोल पाणी, पोषकतत्वे,हरितद्रव्य  व हवेतील कार्बन डायऑक्साइड  यांच्या सहाय्याने अन्न तयार करण्याच्या  प्रकियेस  प्रकाश- संश्लेषण म्हणतात.

* प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेत ऊजेचे रूपांतरण रासायानिक उर्जेत  होते 
ऊर्जा अन्नातोल रासायनिक उर्जेच्या  स्वरूपात साठवली जाते 
जमिनीतून  पाणी, खनिजे  व क्षार शोषण्याचे कार्य मुळे करतात 
* खोडामार्फत हे पाणी व क्षार पानापर्यंत जात असते   हवेतील कार्बन  आत घेतात, पानामधील हरिवलवकास   सूर्यप्रकाश  शोषून घेतो उर्जेच्या  साहाय्याने अनपदार्य तयार केले जातात 
* या प्रक्रियेत ऑक्सिजन मिमोंण होतो व तो   हवेत सोडला जातो 
* वनस्पतीच्या ज्या ज्या भागात हरितद्रव्य असते  तेथे  प्रकाश-संश्लेषण क्रिया  होत असते .
(3) वनस्पतीमधील वहनव्यवस्या 
* वनस्पतीमधील  प्रकार:
 (3) जलवाहिन्या व  रसवाहिन्या
* जलवाहिन्यांचे कार्य सुळांकडून पाणी व क्षार  वनस्पतीच्या वरील  सर्व भागाकडे वाहून नेण्याचे कार्य  : 

रसवाहिन्या
पानामध्ये प्रकाश-संम्लेषणातून  तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर मागांकडे वाहून नेणे . या अन्नाचा वापर वनस्पती मध्ये केला जातो किंवा त्याची साठवण केली जाते.
* वनस्पतामध्ये स्वतंत्र पचनसंस्था व उत्सर्जन संस्था नसते 

नायट्रोजनचे स्थिरीकरण
नायट्रोजन  वायुरूपात हवेमध्ये  असतो. वनस्पती हा वायुरुपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही 
 त्यामुळे त्याचे संयुगात रूपांतर केले जाते. याला नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात.
* नायट्रोजनचे स्थिरीकरण दोन प्रकारानी होते :
 (अ) जैविक  (ब) वातावरणीय 
 नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण
जेव्हा नायट्रोजनचे स्थिरीकरण सूक्ष्मजीव  घडवून आणतात.तेंव्हा त्याला जैविक स्थिरीकरण म्हणतात 

नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण
वीज चमकल्यावर हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साइड  तयार होत असते 
नायट्रिक ऑक्साइडचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साइड बनते.
* नायट्रोजन डायऑक्साइड पावसाच्या पाण्यात विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपातर होते.
* नायट्रिक आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत मूरते. वनस्पती हा नायट्रोजन स्वतःच्या वाढीसाठी वापरतात.

 सहजीवी पोषण (Symbiotic Nutrition) : 
सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी साध्य करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक सजीव एकत्र येतात. तेव्हा त्याला सहजीवी पोषण असे म्हणतात. उदा., दगडफूल.

5) परपोषी वनस्पती (Heterotrophic  Plants) :
परजीवी (Parasitic) वनस्पती : हरितद्रव्ये नसणाऱ्या वनस्पती परपोषी असतात. यातील बहुतेक परजीवी
असतात. त्या इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात. आधार देणाऱ्या वनस्पतीकडून त्या आपले
अन्न मिळवतात. उदा., बांडगूळ, अमरवेल इत्यादी.
6) कीटकभक्षी वनस्पती (Insectivorous Plants) :


* कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवणाऱ्या काही वनस्पती कीटकभक्षी असतात.
नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात राहणाऱ्या वनस्पती हा मार्ग स्वीकारतात.
7) मृतोपजीवी वनस्पती (Saprophytic Plants) :
मृतोपजीवी वनस्पती सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असतात.
* काही बुरशींमुळे अन्न दुषित होते. तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग / आजार होतात, तर काही बुरशींमध्ये
औषधी गुणधर्म आढळून येतात.
* उपयोगी कवक : यीस्ट व काही भूछ्त्र यीस्ट हे किण्व असून त्याचा उपयोग आंबवरण्याच्या प्रक्रियांसाठी
आणि ब्रेड तयार करायला होतो. भूछत्र आहारत घेतल्यास जीवनसत्त्वे व लोह भरपूर प्रमाणात मिळतात.

3. प्राण्यांमधील पोषण (Nutrition In Animals) :

(1) पोषकतत्त्वांची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर या तीन
बाबी प्राण्यांमधील पोषणाशी निगडित असतात.
(2) अन्नातून जे आवश्यक पोषकघटक मिळतात, त्यामुळे शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे पार पडतात.
(3) खाल्लेल्या अन्नातून पचन क्रियेद्वारा विद्राव्य घटक तयार होतात आणि मगच ते रक्तात मिसळतात.
यासाठी पोषणाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
4. पोषणाचे टप्पे :

(1) अन्नग्रहण (Ingestion) : मुखावाटे अन्न शरीरात घेणे म्हणजे अन्नग्रहण .
(2) पचन (Digestion) : अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे.
(3) शोषण (Absorption) : पचनातून तयार झालेले विद्राव्य पदार्थ रक्तामध्ये शोषले जाणे.
(4) सात्मीकरण (Assimilation) : शरीरातील पेशी व ऊतींमध्ये अन्नघटकांचे वहन व तेथे ऊर्जानिर्मिती.
(5) उत्सर्जन (Egestion) : न पचलेले आणि शोषलेले उर्वरित अन्नघटक गुदद्वाराने शरीराबाहेर टाकले
जातात.

5. समभक्षी पोषण (Holozoic Nutrition) :

(1) एकपेशीय सजीवात पोषणाच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीतच होतात. उदा., अमीबा, युग्लीना, पॅरामेशिअम

(2) बहुपेशीय प्राणी तोंडाने अन्नग्रहण करतात.

कीटक - मुखावयव उदा., झुरळ व नाकतोडा. 'कुरतडे' कीटक जबड्यासारखे मुखावयव.
नळीसारखी सोंड. डास व ढेकूण चूषक' सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता.
फुलपाखरू नळीसारखा मुखावयव रक्त अथवा रस ग्रहण करण्याकरिता.

6. अन्नप्रकारांनुसार प्राण्यांचे प्रकार :
(1) शाकाहारी प्राणी (Herbivores) : हे  प्राणी वनस्पती , गवत, बिया, फळे असे अन्न खाणारे.

(2) मांसाहारी प्राणी (Carnivores) :  हे प्राणी इतर प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असणारे. (अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात.) जसे शाकाहारी प्राण्यांना खाणारे, कीटक खाणारे.
(3) मिश्राहारी प्राणी (Omnivores) : अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी असे दोन्हींवर अवलंबून असणारे.
जसे वानर, चिंपांझी, मानव.
(4) स्वच्छताकर्मी (Scavengers) : मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगणारे. जसे, तरस, गिधाडे,
कावळे.

7. विघटक (Decomposers) : काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेषांपासून तसेच काही पदार्थ कुजवून
त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थाच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीवांचे पोषण होते.  हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबर पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचे कार्यही करीत असतात.

परजीवी पोषण (Parasitie Nutriion) :

(1) परजीवी पोषण म्हणजे एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहून  पोषण
प्राप्त करीत असतो: परंतु तो भक्षकाप्रमाणे त्याला ठार मारत नाही.
(2) जर एखादा प्राणी इतर प्राण्याच्या शरीराच्या पृष्ठ भागावर राहून त्याचे रक्त शोघून त्याचा अन्न म्हणून
वापर करीत असेल, तर त्याला बाहयपरजीवी पोषण असे म्हणतात.


इयत्ता सातवी -- सामान्य विज्ञान
पाठ  ४- सजीवांतील पोषण.................................................................
चाचणी सोडविण्यासाठी-- ➤ ➤ क्लिक करा

No comments:

Post a Comment