वाक्प्रचार आणि अर्थ
अंग चोरणे - फारच थोडे काम करणे.
अंगवळणी पडणे - सवय होणे.
अंगाची लाहीलाही होणे -अतिशय संताप निर्माण होणे.
अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे.
ऊर भरून येणे - गदगदून येणे.
कपाळ फुटणे -दुर्दव ओढवणे.
कपाळमोक्ष होणे - मृत्यू येणे/अचानक झालेल्या आधातामुळे उद्ध्वस्त होणे.
कपाळाला हात लावणे - हताश होणे, नाराजी दाखवणे.
कंठ दाटून येणे - गहिवरुन येणे.
कंठस्नान घालणे -शिरच्छेद करणे,
कंठाशी प्राण येणे -खूप कासावीस होणे.
कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
कंबर खचणे - धीर सुटणे.
काढता पाय घेणे- प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे.
कान उघाडणी करणे - चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे.
कान उपटणे- कडक शब्दांत समज देणे.
कान टवकारणे - सावधपणे ऐकणे.
कान टोचणे -कडक शब्दांत चूक लक्षात आणून देणे.
कान निवणे -ऐकून समाधान होणे.
Dakshraj dipak jagtap
ReplyDeleteAaditimadne@gmail.com(Google)
ReplyDelete