Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 5 September 2020

5 Scholarship भाषा 11- वाक्प्रचार अभ्यास व चाचणी

 वाक्प्रचार आणि अर्थ 



अंग चोरणे        - फारच थोडे काम करणे.

अंगवळणी पडणे - सवय होणे.

अंगाची लाहीलाही होणे -अतिशय संताप निर्माण होणे.

अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे.

ऊर भरून येणे - गदगदून येणे.

कपाळ फुटणे -दुर्दव ओढवणे.

कपाळमोक्ष होणे - मृत्यू येणे/अचानक झालेल्या आधातामुळे उद्ध्वस्त होणे.

कपाळाला हात लावणे - हताश होणे, नाराजी दाखवणे.

कंठ दाटून येणे -  गहिवरुन येणे.

कंठस्नान घालणे -शिरच्छेद करणे,

कंठाशी प्राण येणे  -खूप कासावीस होणे.

कंबर कसणे-  जिद्दीने तयार होणे.

कंबर खचणे   - धीर सुटणे.

काढता पाय घेणे-  प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे.

कान उघाडणी करणे - चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे.

कान उपटणे- कडक शब्दांत समज देणे.

कान टवकारणे - सावधपणे ऐकणे.

कान टोचणे -कडक  शब्दांत चूक लक्षात आणून देणे.

कान निवणे  -ऐकून समाधान होणे.

2 comments: