Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 13 August 2024

Importance of the day - 14 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day - 

14 ऑगस्ट  दिनविशेष


आजचा दिनविशेष - घटना :

https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html?m=1

1660 : मुघल सैन्याने चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.

1848 : ओरेगॉनला अमेरिकेचा प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली.

1862 : कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.

1862 : मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.

1893 : मोटार वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश आहे.

1945 : दोन अणुबॉम्बच्या भीतीने होणारा उच्चाटन जपानच्या शरणागतीला आणि दुसरे महायुद्धाच्या समाप्तीस कारणीभूत ठरले.

1943 : नागपूर विद्यापीठाने स्वतंत्र वीर सावरकर यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान केली.

1947 : पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

1947 : स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती.

1958 : एअर इंडियाने दिल्ली-मॉस्को सेवा सुरू केली.

1971 : बहरीनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

2006 : श्रीलंकेच्या हवाई दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेंचोलाई येथे 61 तामिळ मुलींचा मृत्यू झाला.

2010 : सिंगापूर येथे पहिले ‘युवा ऑलिम्पिक गेम्स’ आयोजित करण्यात आले.

आजचा दिनविशेष - जन्म :

1777 : ‘हान्स क्रिस्टियन ओरस्टेड’ – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 9 मार्च 1851)

1907 : ‘गोदावरी परुळेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑक्टोबर 1996)

1911 : भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.

1925 : ‘जयवंत दळवी’ – साहित्यिक, नाटककार पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 सप्टेंबर 1994)

1957 : ‘जॉनी लिव्हर’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म.

1962 : ‘रमीझ राजा’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक यांचा जन्म.

1968 : ‘प्रवीण आमरे’ – क्रिकेटपटू यांचा जन्म


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1958 : ‘जीन फ्रेडरिक जोलिओट’ – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 19 मार्च 1900)

1984 : ‘खाशाबा जाधव’ – 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1926)

1988 : ‘एन्झो फेरारी’ – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1898)

2011 : ‘शम्मी कपूर’ – हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते यांचे निधन. (जन्म : 21 ऑक्टोबर 1931)

2012 : ‘विलासराव देशमुख’ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांचे निधन. (जन्म : 26 मे 1945)

No comments:

Post a Comment