Importance of the day -
13 ऑगस्ट दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1642 : ख्रिश्चन ह्युजेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे ढिगारे शोधून काढले.
1898 : कार्ल गुस्ताव विट यांनी पृथ्वीजवळचा पहिला लघुग्रह 433 इरॉस शोधला.
1918 : बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
1943 : रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती.
1961 : पूर्व जर्मनीने आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत स्थलांतर रोखण्यासाठी आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनच्या भिंतीचे बांधकाम सुरू झाले.
1991 : कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
2004 : अथेन्स, ग्रीस येथे 28 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
आजचा दिनविशेष - जन्म :
1848 : ‘रमेशचंद्र दत्त’ – इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, लेखक, अनुवादक, नागरी सेवक, राजकारणी यांचा जन्म.
1888 : ‘जॉन लोगे बेअर्ड’ – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1946)
1890 : ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे’ – बालकवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 1918)
1898 : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 13 जून 1969)
1899 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 29 एप्रिल 1980)
1906 : ‘विनायक चिंतामण बेडेकर’ – लेखक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1998)
1907 : ‘बेसिल स्पेन्स’ – स्कॉटिश आर्किटेक्ट यांचा जन्म.
1926 : ‘फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ’ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 2016)
1936 : ‘वैजयंतीमाला’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1945 : ‘रॉबिन जॅकमन’ – भारतीय-इंग्लिश क्रिकेटर यांचा जन्म.
1956 : ‘रोहिंटन फली नरिमन’ – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांचा जन्म.
1963 : ‘श्रीदेवी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 2018)
1983 : ‘संदीपन चंदा’ – भारताचा 9 वा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1795 : ‘अहिल्याबाई होळकर’ – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी यांचे निधन. (जन्म : 31 मे 1725)
1826 : ‘रेने लायेनेस्क’ – स्टेथोस्कोप चे शोधक यांचे निधन. (जन्म : 17 फेब्रुवारी 1781)
1910 : ‘फ्लॉरेन्स नायटिंगेल’ – आधुनिक नर्सिंग शास्त्राचा पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका यांचा जन्म. (जन्म : 12 मे 1820)
1917 : ‘एडवर्ड बकनर’ – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 मे 1860)
1936 : मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1861)
1946 : ‘एच. जी. वेल्स’ – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1866)
1971 : ‘डब्ल्यू. ओ. बेंटले’ – बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक यांचे निधन.
1980 : ‘पुरुषोत्तम भास्कर भावे’ – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 12 एप्रिल 1910)
1985 : ‘जे. विलार्ड मेरिऑट’ – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1900)
1988 :’ गजानन जागीरदार’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे पहिले संचालक यांचे निधन.
2000 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1965)
2015 : ‘ओम प्रकाश मंजाल’ – हिरो सायकल चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 ऑगस्ट 1928)
No comments:
Post a Comment