Importance of the day -
17 ऑगस्ट दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1666 : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले.
1836 : जन्म नोंदणी कायदा ब्रिटिश संसदेने मंजूर केला आणि 1837 मध्ये अंमलात आला.
1945 : इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1953 : नार्कोटिक्स एनोनिमसने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पहिली बैठक घेतली.
1982 : पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
1988 : पाकिस्तानचे 6 वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया-उल-हक आणि पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत अरनॉल्ड राफेल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
1997 : उस्ताद अली अकबर खान यांना यूएस राष्ट्रीय वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1999 : तुर्कीच्या इझमित शहराजवळ 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप. 17,000 ठार, 44,000 जखमी.
2008 : एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदके जिंकणारा मायकेल फेल्प्स हा पहिला खेळाडू ठरला.
1 st to 10 th online Test
https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html?m=1
आजचा दिनविशेष - जन्म :
1761 : ‘पं. विल्यम केरी’ – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1834)
1844 : ‘मेनेलेक (दुसरा)’ – इथियोपियाचा सम्राट यांचा जन्म.
1866 : ‘मीर महबूब अली खान’ – हैदराबादचा सहावा निजाम यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1911)
1888 : ‘बाबूराव जगताप’ – श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक यांचा जन्म.
1893 : ‘मे वेस्ट’ – हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1980)
1905 : ‘शंकर गणेश दाते’ – ग्रंथसूचीकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 1964)
1916 : ‘डॉ. विनायक पेंडसे’ – ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 1975)
1926 : ‘जिआंग झिमिन’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव यांचा जन्म.
1932 : ‘व्ही. एस. नायपॉल’ – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक यांचा जन्म.
1944 : ‘लैरी एलिसन’ – ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचा जन्म.
1949 : ‘निनाद बेडेकर’ – इतिहास संशोधक यांचा जन्म.
1957 : ‘सचिन पिळगांवकर’ – मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते यांचा जन्म.
1967 : ‘सुप्रिया पिळगांवकर’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1970 : अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1304 : ‘गोफुकाकुसा’ – जपानी सम्राट यांचे निधन.
1850 : ‘जोस डे सान मार्टिन’ – पेरू देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1778)
1909 : ‘मदनलाल धिंग्रा’ – क्रांतीकारक यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1883)
1924 : ‘टॉम केन्डॉल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचे निधन.
1988 : ‘मुहम्मद झिया उल हक’ – पाकिस्तानचे 6 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1924)
No comments:
Post a Comment