Importance of the day -
18 ऑगस्ट दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1841 : जगातील पहिले राष्ट्रीय अग्निशमन दल ब्रिटनमध्ये स्थापन झाले.
1920 : अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
1942 : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकवण्यात आला.
1945 : सुकर्णो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.
1958 : बांगलादेशचा ब्रोजन दास इंग्लिश चॅनल पार करणारा पहिला आशियाई बनला.
1963 : जेम्स मेरेडिथ मिसिसिपी विद्यापीठातून पदवीधर होणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले.
1999 : सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या किंवा गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर पोलिस कोठडीत असलेल्या व्यक्तींना मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली.
2008 : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
📁अभ्यास माझा 📝
*पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास* *💎 एका क्लिकवर🖱️* https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html *
🛡️ सेमी इंग्रजी माध्यम* *💎 Class 5 th to 8 th* *Semi English Mathematics and Science Online Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html *
1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉* https://www.studyfromhomes.com/
*3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi*
https://www.mystudyfromhomes.in/
*4️⃣ For Class Seventh Questionnaire*
आजचा दिनविशेष - जन्म :
1700 : ‘थोरले बाजीराव पेशवे’ – मराठा साम्राज्याचे पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1740)
1734 : ‘रघुनाथराव पेशवा’ – यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 1783)
1792 : ‘जॉन रसेल’ – युनायटेड किंगडमचे पंतप्रधान यांचा जन्म.
1872 : ‘पं. विष्णू दिगंबर पलुसकर’ – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1931)
1886 : ‘सेवानंद गजानन नारायण कानिटकर’ – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 नोव्हेंबर 1959)
1900 : ‘विजयालक्ष्मी पंडीत’ – भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहिण, राजदूत, राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 1 डिसेंबर 1990)
1923 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर गुगली गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 22 जून 1955)
1934 : ‘गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक यांचा जन्म.
1936 : ‘रॉबर्ट रेडफोर्ड’ – हॉलिवूडमधील अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी यांचा जन्म.
1956 : ‘संदीप पाटील’ – भारतीय फलंदाज यांचा जन्म.
1959 : ‘निर्मला सीतारामन्’ – केंद्रीय अर्थमंत्री यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1227 : ‘चंगीझ खान’ – मंगोल सम्राट यांचे निधन.
1850 : ‘ऑनोरे दि बाल्झाक’ – फ्रेंच लेखक यांचे निधन.
1886 : ‘एली व्हिटनी ब्लेक’ – मॉर्टिस लॉक चे शोधक यांचे निधन. (जन्म : 27 जानेवारी 1795)
1919 : ‘जोसेफ ई. सीग्राम’ – सीग्राम कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1841)
1940 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1875)
1945 : ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ – भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 23 जानेवारी 1897)
1979 : ‘वसंतराव नाईक’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 जुलै 1913)
1998 : ‘पर्सिस खंबाटा’ – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1948)
2008 : ‘नारायण धारप’ – रहस्यकथाकार यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1925)
2009 : ‘किम दे-जुंग’ – दक्षिण कोरियाचे 8वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
2012 : ‘रा. की. रंगराजन’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन.
No comments:
Post a Comment