Importance of the day
24 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1664 : नेदरलँड्सने न्यू ॲमस्टरडॅम इंग्लंडला दिले.
1873 : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी वायोमिंगमधील डेव्हिल्स टॉवर हे देशाचे पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
1932 : पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बी.एस्सी. मुकुंदराव जयकर आदींच्या स्वाक्षऱ्या.
1946 : हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
1948 : होंडा मोटार कंपनीची स्थापना.
1950 : पूर्व युनायटेड स्टेट्स पश्चिम कॅनडातील चिंचगा आगीमुळे दाट धुक्याने झाकले गेले.
1954: AEC रूटमास्टर, लंडनची प्रतिष्ठित बस सादर करण्यात आली
1960 : अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
1973 : गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
1995 : मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
1996 : 71 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
1999 : कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
2007 : कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-20 विश्वकप जिंकला
2008 : थाबो म्बेकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
2009 : G20 शिखर परिषद पिट्सबर्गमध्ये 30 जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाली.
2014 : मार्स ऑर्बिटर मिशनने भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले.
2015 : मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत 717 लोक ठार.
2023 : नासाचे OSIRIS-REx कॅप्सूल ज्यामध्ये लघुग्रह 101955 बेन्नूचे नमुने आहेत ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आले.
*📚
इयत्ता - 7 वी*
*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_22.html*
*📚 इयत्ता - 8 वी*
*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_33.html*
*✴️Abhyas majha*
*✴️Online Test Series*
आजचा दिनविशेष - जन्म :
1534 : ‘गुरू राम दास’ – शिखांचे 4 थे गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 1581)
1551 : ‘दासो दिगंबर देशपांडे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1616)
1861 : ‘मॅडम भिकाजी रुस्तुम कामा’ – भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1936)
1870 : ‘जॉर्जेस क्लॉड’ – नीऑन लाईट चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1960)
1889 : ‘केशवराव त्र्यंबक दाते’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1971)
1898 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1960)
1902 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरु आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1989)
1911 : ‘कॉन्स्टंटिन चेरेनेन्को’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1985)
1915 : ‘प्रभाकर शंकर मुजूमदार’ – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत यांचा जन्म.
1921 : ‘डॉ. सखाराम गंगाधर मालशे’ – लेखक, समीक्षक व संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1992)
1922 : ‘गजानन वासुदेव बेहेरे’ – सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1989)
1924 : ‘गुरू चरणसिंग तोहरा’ – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 2004)
1925 : ‘ऑटो सिंग पेंटल’ – भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2004)
1936 : ‘शिवती आदितन’ – भारतीय उद्योजिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 2013)
1940 : ‘आरती साहा’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1994)
1950 : ‘मोहिंदर अमरनाथ’ – क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1896 : ‘लुईस गेरहार्ड डी गेर’ – स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1818)
1939 : ‘कार्ल लामेल्स्’ – युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 जानेवारी 1867)
1998 : ‘वासुदेव पाळंदे’ – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक यांचे निधन.
2002 : ‘श्रीपाद जोशी’ – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक यांचे निधन.
No comments:
Post a Comment