Importance of the day
8 सप्टेंबर दिनविशेष
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
आजचा दिनविशेष - घटना :
1831 : विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
1857 : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी
1900 : अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे 8,000 ठार.
1944 : दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.2 बॉम्बचा हल्ला.
1954 : साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
1962 : स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
1966 : स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
1991 : मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
2000 : सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
2001 : लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.
*🗓️ 6 th Mathematics Quadrilateral*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/04/class-6-thmathematics-16-quadrilaterals.html
*🗂️ Operation on rational numbers*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/05/class-7-th-mathematics-5-operations-on_24.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1157 : इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू : 6 एप्रिल 1199)
1830 : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.
1846 : भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू : 27 मे 1926)
1848 : जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1897)
1887 : योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जुलै 1963)
1901 : दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.
1918 : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.
1925 : इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू : 24 जुलै 1980)
1926 : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 2011)
1933 : जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.
1999 : ‘शुभमन गिल’ – भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू यांचा जन्म.
*📝नवोदय सराव संच गणित चाचणी 4*
https://www.studyfromhomes.com/2020/10/5-navoaday-examination-4.html
*📝Navodaya vidyalaya Entrance test Language practice*
https://www.studyfromhomes.com/2020/10/5-navodaya-examination-3.html
*🗓️ Language practice test 2*
https://www.studyfromhomes.com/2020/10/5-navoday-examination-2.html
आजचा दिनविशेष - मृत्यू :
701 : 701ई पूर्व : पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 687)
1933 : इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.
1960 : इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म : 12 सप्टेंबर 1912)
1965 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.
1970 : मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म : 19 जुलै 1894)
1980 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.
1981 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.
1981 : अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1897)
1982 : जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1905)
1991 : कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म : 6 ऑक्टोबर 1913)
2010 : कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म : 19 मे 1964)
*🗂️ 6 th General Science test*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/6-th-science/
*📝 8 th General Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/8-th-science/
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साक्षरतेचे महत्त्व आणि शिक्षणाचे अधिकार यावर जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. साक्षरता ही व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. साक्षरतेच्या अभावामुळे व्यक्ती आणि समाज दोघेही मागे राहू शकतात.
युनेस्कोने 1966 मध्ये या दिनाची स्थापना केली, त्याचा उद्देश जगभरातील साक्षरतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि शिक्षणाच्या सार्वत्रिक हक्काची पूर्तता करणे होता. अनेक देशांमध्ये अजूनही साक्षरतेचा अभाव आहे, विशेषतः महिला आणि मुली यांच्यामध्ये. अशा परिस्थितीत, साक्षरतेची गती वाढवणे आणि साक्षरतेसाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
साक्षरता केवळ वाचन-लेखन यापुरती मर्यादित नाही, तर ती व्यक्तीच्या विचारक्षमतेचा, आत्मविश्वासाचा आणि समाजातील सहभागाचा आधार आहे. साक्षर लोक स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनात अधिक सकारात्मक बदल घडवू शकतात.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव ठेवून, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षण आणि साक्षरता यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थाने समृद्ध आणि प्रगतिशील होऊ शकतो.
No comments:
Post a Comment