Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 15 October 2024

Importance of the day 16 ऑक्टोबर दिनविशेष

 


Importance of the day 

16 ऑक्टोबर  दिनविशेष

जागतिक अन्न दिन

आजचा दिनविशेष - घटना :

1775 : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

1793 : फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

1868 : डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व अधिकार ब्रिटीशांना विकले.

1905 : भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीचा आदेश दिला.

1923 : वॉल्ट डिस्ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांनी वॉल्ट डिस्ने कंपनीची स्थापना केली.

1949 : ग्रीक कम्युनिस्ट पक्षाने “तात्पुरता युद्धविराम” जाहीर केला, अशा प्रकारे ग्रीक गृहयुद्ध संपुष्टात आले.

1951 : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

1978 : वांडा रुटकिएविझ माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली युरोपियन महिला ठरली.

1986 : रेनॉल्ड मेसनर 8000 मीटरपेक्षा उंच 14 शिखरे सर करणारी पहिली व्यक्ती ठरली.

1995 : स्कॉटलंडमधील स्काय ब्रिज उघडला.

1999 : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

आजचा दिनविशेष - जन्म :

1670 : ‘बंदा सिंग बहादूर’ – शिख सेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1716)

1841 : ‘इटो हिरोबुमी’ – जपानचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑक्टोबर 1909)

1844 : ‘इस्माईल क्यूम्ली’ – अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 24 जानेवारी 1919)

1854 : ‘ऑस्कर वाईल्ड’ – आयरिश लेखक व नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 30 नोव्हेंबर 1900)

1886 : ‘डेव्हिड बेन-गुरीयन’ – इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म.

1890 : ‘अनंत हरी गद्रे’ – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 3 सप्टेंबर 1967)

1896 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 18 जून 1974)

1907 : ‘सोपानदेव चौधरी’ – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1982)

1926 : ‘चार्ल्स डोलन’ – केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक यांचा जन्म.

1948 : ‘हेमा मालिनी’ – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक यांचा जन्म.

1949 : ‘क्रेझी मोहन’ – भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार यांचा जन्म.

1959 : ‘अजय सरपोतदार’ – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 2010)

1982 : ‘पृथ्वीराज सुकुमारन’ – भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता यांचा जन्म.

2003 : ‘कृत्तिका’ – नेपाळची राजकन्या यांचा जन्म.

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1793 : ‘मेरी आंत्वानेत’ – फ्रेन्च सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 2 नोव्हेंबर 1755)

1799 : ‘वीरपदिया कट्टाबोम्मन’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 3 जानेवारी 1760)

1905 : ‘पंत महाराज बाळेकुन्द्री’ – आध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1855)

1944 : ‘गुरुनाथ प्रभाकर ओगले’ – उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते यांचे निधन.

1948 : ‘माधव नारायण जोशी’ – नाटककार यांचे निधन.

1950 : ‘दादासाहेब केतकर’ – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन.

1951 : ‘लियाकत अली खान’ – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म : 1 ऑक्टोबर 1895)

1997 : ‘दत्ता गोर्ले’ – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक यांचे निधन.

2002 : ‘नागनाथ संतराम इनामदार’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1923)

2013 : ‘गोविंद पुरुषोत्तम देशपांडे’ – भारतीय नाटककार यांचे निधन.


No comments:

Post a Comment