Importance of the day
18 ऑक्टोबर दिनविशेष
18 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
1867 : अमेरिकेने सोव्हिएत रशियाला 7.2 दशलक्ष डॉलर्स देऊन अलास्काचा भूभाग विकत घेतला आणि ताब्यात घेतला.
1879 : थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना.
1906 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
1919 : राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकर यांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला.
1922 : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना.
1954 : टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सने रीजेंसी TR-1 ची घोषणा केली, जो पहिला मोठ्या प्रमाणात उत्पादित ट्रान्झिस्टर रेडिओ आहे.
1963 : फेलिसेट, अंतराळात सोडलेली पहिली मांजर बनली.
1967 : सोव्हिएत रशियाचे व्हीनूसा-4 अंतराळयान शुक्रावर उतरले.
1977 : 2060-चिरॉन, अंतराळातील सर्वात दूरचा लघुग्रह शोधला गेला.
1991 : अझरबैजानच्या सर्वोच्च परिषदेने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्याची घोषणा स्वीकारली.
2002 : सचिन तेंडुलकर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 20,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
2019 : NASA अंतराळवीर जेसिका मीर आणि क्रिस्टीना कोच पॉवर कंट्रोलर बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर पडल्यावर पहिल्या महिला स्पेसवॉकमध्ये भाग घेतात.
18 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
1804 : ‘मोंगकुट (चौथा)’ – थायलंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑक्टोबर 1868)
1861 : ‘चिंतामणराव वैद्य’ – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1938)
1925 : ‘इब्राहिम अल्काझी’ – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक यांचा जन्म.
1925 : ‘रमीझ अलिया’ – अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑक्टोबर 2011)
1950 : ‘ओम पुरी’ – अभिनेता यांचा जन्म.
1956 : ‘मार्टिना नवरातिलोव्हा’ – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1974 : ‘अमिश त्रिपाठी’ – भारतीय लेखक यांचा जन्म.
1977 : ‘कुणाल कपूर’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1977 : ‘स्वप्नील जोशी’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1984 : ‘फ्रीडा पिंटो’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
18 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :
1871 : ‘चार्ल्स बॅबेज’ – पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1791)
1909 : ‘लालमोहन घोष’ – देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1849 – कलकत्ता)
1931 : ‘थॉमस अल्वा एडिसन’ – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक यांचे निधन. (जन्म : 11 फेब्रुवारी 1847)
1951 : ‘हिराबाई पेडणेकर’ – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1885)
1976 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – भारतीय कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 10 सप्टेंबर 1895)
1983 : ‘विजय मांजरेकर’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1931)
1987 : ‘वसंतराव तुळपुळे’ – कम्युनिस्ट कार्यकर्ते यांचे निधन.
1993 : ‘मंदाकिनी विश्वनाथ आठवले’ – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री यांचे निधन.
1995 : ‘ई. महमद’ – छायालेखक यांचे निधन.
2004 : ‘वीरप्पन’ – चंदन तस्कर याचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1952)
No comments:
Post a Comment