Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday, 18 October 2024

Importance of the day 19 ऑक्टोबर दिनविशेष



 

Importance of the day 

19 ऑक्टोबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1216 : इंग्लंडचा राजा जॉन मरण पावला आणि त्याचा 9 वर्षांचा मुलगा हेन्री सिंहासनावर बसला.

1791 : स्वीडन आणि रशिया यांच्यात ड्रॉटनिंगहोमचा करार

1812 : नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोमधून माघार घेतली.

1914 : पहिले महायुद्ध : यप्रेसची पहिली लढाई सुरू झाली.

1933 : जर्मनी लीग ऑफ नेशन्समधून बाहेर पडला.

1935 : लीग ऑफ नेशन्सने, इथिओपियावर आक्रमण केल्याबद्दल इटलीवर आर्थिक निर्बंध लादले.

1944 : दुसरे महायुद्ध – युनायटेड स्टेट्सचे सैन्य फिलीपिन्समध्ये उतरले.

1956 : सोव्हिएत युनियन आणि जपानने संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ऑगस्ट 1945 पासून अस्तित्त्वात असलेल्या दोन देशांमधील युद्धाची स्थिती अधिकृतपणे समाप्त केली.

1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाला देण्यात आले.

1974 : नियू ही न्यूझीलंडची स्वयंशासित वसाहत बनली.

1987 : युनायटेड स्टेट्स नेव्हीने ऑपरेशन निंबल आर्चर केले, पर्शियन गल्फमधील दोन इराणी तेल प्लॅटफॉर्मवर हल्ला.

1993 : पुण्याजवळील महारेडिओ टेलिस्कोप, GMRT प्रकल्पाचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ, प्रा. गोविंद स्वरूप यांना सर सी. व्ही. रमण पदक जाहीर.

1994 : रुद्र वीणा वादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्काराने सन्मानित केले.

2000 : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य सरकारच्या गीत सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2005 : सद्दाम हुसेनवर बगदादमध्ये मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी खटला सुरू.


आजचा दिनविशेष - जन्म :

1902 : ‘दिवाकर कृष्ण केळकर’ – कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1973 – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

1910 : ‘सुब्रमण्यन चंद्रशेखर’ – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1995)

1920 : ‘पांडुरंगशास्त्री आठवले’ – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)

1922 : ‘शांता शेळके’ – मराठी कवी आणि लेखक यांचा जन्म.

1925 : ‘डॉ. वामन दत्तात्रय वर्तक’ – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2001)

1936 : ‘शांताराम नांदगावकर’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुलै 2009)

1954 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 2002)

1961 : ‘सनी देओल’ – अभिनेते यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1216 : ‘जॉन’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1166)

1934 : ‘विश्वनाथ कार’ – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1864)

1937 : ‘अर्नेस्ट रुदरफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1871)

1986 : ‘समोरा महेल’ – मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1933)

1950 : ‘विष्णू गंगाधर केतकर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1887)

1995 : ‘सलमा बेग ऊर्फ कुमारी नाझ’ – बाल कलाकार व अभिनेत्री यांचे निधन.

2003 : ‘अलिजा इझेटबेगोविच’ – बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1925)

2011 : ‘कक्कणदन’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1935)

No comments:

Post a Comment