आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
Importance of the day
2 ऑक्टोबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1909 : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन संस्थेची स्थापना केली.
1925 : जॉन लोगी बेयर्ड यांनी पहिला दूरदर्शन संच दाखवला.
1955 : पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
1958 : गिनीला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1967 : थुरगुड मार्शल हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती बनले.
1969 : आरबीआयने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त महात्मा गांधींची प्रतिमा आणि स्वाक्षरी असलेल्या 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जारी केल्या.
2006 : निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर स्वत आत्महत्या केली.
आजचा दिनविशेष - जन्म :
1847 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑगस्ट 1934)
1869 : ‘मोहनदास करमचंद गांधी’ – महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
1891 : ‘विनायक पांडुरंग करमरकर’ – पद्मश्री विजेते शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 जून 1967)
1904 : ‘लालबहादूर शास्त्री’ – भारतरत्न यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1966)
1908 : ‘गंगाधर बाळकृष्ण सरदार’ – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 डिसेंबर 1988)
1927 : ‘पं. दिनकर कैकिणी’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 23 जानेवारी 2010)
1939 : ‘बुद्धी कुंदर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 2006)
1942 : ‘आशा पारेख’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1948 : ‘पर्सिस खंबाटा’ – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑगस्ट 1998)
1968 : ‘याना नोव्होत्ना’ – झेक लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1971 : ‘कौशल इनामदार’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1906 : ‘राजा रविवर्मा’ – चित्रकार याचं निधन. (जन्म : 29 एप्रिल 1848)
1927 : ‘स्वांते अर्हेनिअस’ – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ याचं निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1859)
1975 : ‘के. कामराज’ – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री याचं निधन. (जन्म : 15 जुलै 1903)
1985 : ‘रॉक हडसन’ – अमेरिकन अभिनेते याचं निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1925)
No comments:
Post a Comment