Importance of the day
23 ऑक्टोबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना
1707 : ग्रेट ब्रिटनच्या पहिल्या संसदेची बैठक झाली.
1850 : अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क अधिवेशन सुरू झाले.
1890 : हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून लघुकथा लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
1940 : एडॉल्फ हिटलर आणि फ्रान्सिस्को फ्रँको हेंडये येथे भेटले आणि स्पेनच्या दुसऱ्या महायुद्धात प्रवेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली.
1944 : दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने हंगेरीत प्रवेश केला.
1973 : संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायल आणि सीरिया यांच्यातील युद्ध संपले.
1997 : किरण बेदी यांना सामाजिक कार्यासाठी जर्मन जोसेफ ब्यूस पुरस्कार प्रदान.
1998 : इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाने वाई नदी मेमोरँडमवर स्वाक्षरी केली.
2001 : ऍपल कॉम्प्युटरने आयपॉड रिलीज केले
2007 : STS-120 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली, पामेला मेलरॉय ही दुसरी महिला स्पेस शटल कमांडर बनली
आजचा दिनविशेष - जन्म :
1778 : ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचा जन्म. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1829)
1879 : ‘शंकर रामचंद्र राजवाडे’ – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 1952)
1900 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 18 जून 1958)
1923 : ‘दामोदर दिनकर कुलकर्णी’ – श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 2000)
1923 : ‘असलम फारुखी’ – भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 15 जुन 2016)
1924 : ‘पं. राम मराठे’ – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1989)
1937 : ‘देवेन वर्मा’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 2 डिसेंबर 2014)
1940 : ‘पेले’ – ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
1945 : ‘शफी इनामदार’ – अभिनेते व नाट्यनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1996)
1974 : ‘अरविंद अडिगा’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
1979 : ‘प्रभास’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
1975 : ‘मलायका अरोरा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
1981 : ‘सिद्धार्थ जाधव’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1910 : ‘चुलालोंगकोर्ण (पाचवा)’ – थायलँडचा राजा यांचे निधन. (जन्म : 20 सप्टेंबर 1853)
1915 : ‘डब्ल्यू. जी. ग्रेस’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1848)
1921 : ‘जॉन बॉईड डनलॉप’ – चाकात हवा भरलेली ट्यूब वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1840)
1957 : ‘ख्रिश्चन डायर’ – एस.ए. चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1905)
2012 : ‘सुनील गंगोपाध्याय’ – बंगाली कवी व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1934)
No comments:
Post a Comment