Importance of the day
24 ऑक्टोबर दिनविशेष
जागतिक पोलिओ दिन
संयुक्त राष्ट्र दिन
24 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
1605 : मुघल सम्राट जहांगीरचा राज्याभिषेक झाला.
1795 : रशिया, प्रशिया आणि ऑस्ट्रियाने पोलंडचा ताबा घेतला.
1851 : विल्यम लासेलने युरेनस ग्रहाचे अम्ब्रिअल आणि एरियल हे चंद्र शोधले.
1857 : शेफिल्ड एफ.सी. जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब इंग्लंडमधील शेफील्ड येथे सुरू झाला.
1861 : युनायटेड स्टेट्समधील पहिली आंतरखंडीय टेलिग्राफ लाइन पूर्ण झाली.
1901 : एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
1909 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसरा साजरा करण्यात आला.
1931 : हडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला.
1945 : संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली.
1946 : V-2 क्रमांक-13 रॉकेटवर बसलेल्या कॅमेऱ्याने अंतराळातून पृथ्वीचे पहिले छायाचित्र घेतले.
1949 : संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाने काम सुरू केले.
1963 : देशातील दुष्काळामुळे सार्वजनिक आणि मोठ्या समारंभात तांदूळ खाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
1964 : उत्तर ऱ्होडेशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचे नाव झांबिया असे ठेवण्यात आले.
1972 : दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
1984 : भारतातील पहिला भुयारी मार्ग कोलकात्यात सुरू झाला.
1997 : सतारवादक पंडित रविशंकर यांना
संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रीमियम इम्पीरियल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1998 : लघुग्रह पट्ट्याचा शोध घेण्यासाठी आणि नवीन अंतराळ यान तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी डीप स्पेस 1 लाँच करण्यात आले.
2000 : थोर समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा पुरस्कार. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला..
2003 : कॉन्कॉर्डने शेवटचे व्यावसायिक उड्डाण केले.
2016 : सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आले.
2018 : जगातील सर्वात लांब समुद्र क्रॉसिंग, हाँगकाँग-झुहाई-मकाऊ ब्रिज, सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला
24 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
1632 : ‘अँथनी व्हॉन लीवेनहॉक’ – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑगस्ट 1723)
1775 : ‘बहादूरशहा जफर’ – दिल्लीचा शेवटचा बादशहा यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1862)
1868 : ‘भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी’ – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 1951)
1894 : ‘विभुद्धभाषण मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 1987)
1910 : ‘लीला भालजी पेंढारकर’ – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यांचा जन्म.
1914 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुलै 2012)
1921 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 2015)
1926 : ‘केदारनाथ सहानी’ – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 2012)
1935 : ‘मार्क टुली’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
1963 : ‘अरविंद रघुनाथन’ – भारतीय अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
1972 : ‘मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म
24 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :
1601 : ‘टायको ब्राहे’ – डच खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1546)
1922 : ‘जॉर्ज कॅडबरी’ – कॅडबरी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1839)
1944 : ‘लुई रेनॉल्ट’ – रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 12 फेब्रुवारी 1877)
1979 : ‘कार्लो अबारट’ – अबारथ कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1908)
1991 : ‘जीन रोडडेबेरी’ – स्टार ट्रेक चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1921)
1991 : ‘इस्मत चुगताई’ – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1915)
1992 : ‘अरविंद गोखले’ – मराठी नवकथेचे जनक यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1919)
1995 : ‘माधवराव साने’ – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यांचे निधन.
2011 : ‘जॉन मॅककार्थी’ – लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक यांचे निधन. (जन्म : 4 सप्टेंबर 1927)
2013 : ‘मन्ना डे’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 1 मे 1919)
2014 : ‘एस. एस. राजेंद्रन’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन.
No comments:
Post a Comment