Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 1 August 2020

सातवी सा.विज्ञान २. वनस्पती रचना व कार्ये Plant Structure Online Test

2- वनस्पती रचना व कार्य
खालील ठळक मुद्दे यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा

वनस्पतीचे अवयव
मूळ, खोड ,पान, फुले ,फळे हे वनस्पती चे अवयव आहे.
यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून वनस्पतीचीओळख करून घेता येते.

मूळ. ( Root)

जमिनीखाली आधारासाठी वाढणारा वनस्पतीचा अवयव म्हणजे मूळ होय .
मुळे दोन प्रकारची असतात- सोटमूळ, तंतुमय मुळे सोटमूळ हे द्विदल वनस्पती मध्ये तर तंतुमय मूळ हे एकदल वनस्पती मध्ये असते .
● आदिमूळ
बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा भाग म्हणजे आदीमुळ होय. याचेच पुढे मूळ होते. मुळाची वाढ जमिनीखाली होते .

अंकुर
जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे अंकुर होय. अंकुराचे पुढे खोड होते.
खोडाची वाढ जमिनीच्या वर होते.




सोटमूळ
या प्रकारचे मूळ जमिनीलगत जाडसर असते.मात्र पुढे ते निमुळते होत जाऊन टोकदार होते .काही वनस्पतीत मुळाना उप मुळे सुद्धा फुटतात.



उपमुळे तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. त्या मुळे झाडाला आधार देण्याचे कार्य सोटमूळ करते.
मूलरोम
मूलरोम म्हणजे मुळांच्या टोकांच्या भागावर असणारे केसासारखे धागे.
मूलटोपी
मुळांच्या टोकाच्या भागात मूलटोपीची वाढ होत असते. आणि मुळाचा टोकाचा भाग हा नाजूक असल्याने हा भाग संरक्षित करण्यासाठी असणाऱ्या टोपीसारखा आवरणाला मूलटोपी असे म्हणतात .
तंतुमय मुळे 
खोडापासून फुटणारी तंतुसारखी मुळे म्हणजे तंतुमय मुळे.
तंतुमय मुळे ही द्विदल वनस्पती मध्ये दिसतात.
आगंतुक मुळे
जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी मुळे म्हणजे आगंतुक मुळे.
उदाहरण- मका, ऊस, ज्वारी यांना दोन प्रकारची मुळे असतात. आगंतुक आणि जमिनी खाली असणारी मुळे.

मुळांची कार्य
मुळांचे नियमित कार्य माती घट्ट धरून ठेवणे.
पाणी ,खनिजे व क्षार शोषून घेणे व झाडाला पुरवणे. झाडाला आधार देणे.
● रूपांतरित मुळे, हवाई मुळे, आधार मुळे ,धावती मुळे, श्वसन मुळे

● रूपांतरित मुळांची कार्य
हवाई मुळे वातावरणातील बाष्प शोषण करतात. आधारमुळे जमिनीबाहेर झाडाला आधार देतात.
धावती मुळे प्रजननाचे कार्य करतात. तर श्वसन मुळे श्वसनाचे काम करतात.

खोड (stem)
खोडाची वाढ ही जमिनीच्या वर होत असते.
 बी रूजल्यावर त्याच्या अंकुरा पासून जमिनीचा वर खोड तयार होते.
अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी सुद्धा वाढते.
खोडावरच्या ज्या ठिकाणाहून पाने फूटतात त्याला पेरे म्हणतात.
दोन क्रमवार पेरा मध्ये जे अंतर असते त्याला कांडे म्हणतात.
खोडाच्या अग्र भागाला मुकुल असे म्हणतात.

पान (leaf)
पेराच्या जागी खोडातून पाने फुटतात .
पाने सामान्यतः हिरव्या रंगाची पातळ आणि पसरट
असतात.

पानाचे भाग
पर्णपत्र
पर्णपत्र हा पानाचा पसरट भाग असतो .
पर्णधारा
पर्णपत्राची कडा म्हणजे पर्णधारा
कर्णधाराचे प्रकार- सलग, खंडित किंवा दंतेरी
पर्णाग्र
पर्णपत्राचे पुढचे टोक म्हणजे पर्णाग्र.
पर्णाग्रचे प्रकार निमुळते, टोकदार व गोलाकार असे आहेत.
देठ
काही पानांना देठ असतात तर काही पानांना देठ नसतात.
पर्णतल
पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय.
उपपर्ण
पानाच्या तळाशी असणारा छोटासा पानासारखा भाग म्हणजे उपपर्ण होय.

● पानांचे प्रकार दोन प्रकार पडतात
मुख्य प्रकार -साधे पानसंयुक्त पान

★ साधेपान
या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते.
★ संयुक्त पान
या पानांमध्ये मुख्य शिरे भोवती पर्णपत्र अनेक लहान-लहान परीक्षांमध्ये विभागलेले असते.

पानांची मांडणी
खोडावरील पानांच्या मांडणीनुसार पानांचे एकांतरित, आवर्ती ,संमुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात.
पर्णपत्राच्या आकारानुसार गोलाकार ,तरफदार, लंबाकार असे प्रकार पडतात.

शिराविन्यास
शिराविन्यास दोन प्रकारचा असतो.
जाळीदार शिराविन्यास
पर्णपत्राच्या मध्यभागी एक जाड शीर असल्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांमध्ये विभागले सारखे दिसते.
या मुख्य शिरेला उपशिरा फुटलेल्या असतात आणि त्यांची जाळी तयार होते.
उदाहरणार्थ -द्विदल वनस्पतीची पाने -पिंपळ

समांतर शिराविन्यास
पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या सुरुवातीपासून ते थेट टोकापर्यंत एकमेकांना समांतर असतात.
उदाहरण -एकदल वनस्पतीची पाने -मका

फुल (flower)
जास्वंद फुलांचे अवयव



देठ
फुलांचा देठ हे लांब किंवा आखूड असते. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते.
पुष्पाधार
सामान्यतः पसरट व फुगीर भाग जेथे फुल देठाला चिकटलेले असते.
फुलांचे सर्व भाग पुष्पा दारावर रचलेले असतात.
निदलपुंज
निदलपुंज हा फुलांचा सर्वात बाहेरचा भाग असतो. हिरव्या रंगाचा संरक्षक असतो. कळी अवस्थेत पाकळ्यांना झाकून ठेवणारा हा अवयव आहे.
दलपुंज
रंगीत किंवा रंग पाकळ्यांनी बनलेला दलपुंज असतो.

पूमंग
हा पुंकेसराचा बनलेला फुलाचा पुल्लिंगी भाग असतो. त्यात परागकोश व वृंत असतात.
जायांग
जायांग हा स्त्रि केसराचा बनलेला फुलाचा स्त्रीलिंगी भाग असतो. त्यात कुक्षीवृंत  व अंडाशय असते.
परागीभवन
परागकण कुक्षी वर जाऊन पडण्याच्या क्रियेला परागीभवन म्हणतात.
यासाठी परागकोश पक्व होऊन फुटतो आणि त्यातील परागकण बाहेर पाठवले जातात.

फलन
अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होण्याच्या क्रियेला फलन म्हणतात.
बीजांडाची बी होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळांमध्ये होते.

फळ (fruit)
★ प्रत्येक फळांमध्ये काही ठराविक वैशिष्ट्ये असतात.
★फळांचा आकार, रंग, चव, कवचाची गराची व बियांची रचना, बियांची संख्या यामध्ये विविधता आढळून येते.
★काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस दिसते. उदाहरण -काजू ,

द्विदल  बी 
ज्या बीचे दोन समान भाग होतात तिला द्विदल बी म्हणतात.
एकदल बी
ज्या बीचे दोन समान भाग होत नाही तिला एकदल बी म्हणतात.

इयत्ता सातवी -- सामान्य विज्ञान 
पाठ  २.   वनस्पती रचना व कार्ये 
चाचणी सोडविण्यासाठी-- ➤ ➤    क्लिक करा

1 comment:

  1. Test is so brilliantly done.but pls. Available 8th science test with points.only 2 test of8th class science available.its very helpful for us.

    ReplyDelete