खालील खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा व सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा
भरती ओहोटी
समुद्राचे पाणी कधीकधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते तर कधी किनाऱ्यापासून आत दूर पर्यंत जाते.
सागर जलाच्या या हालचालींना अनुक्रमे भरती व ओहोटी म्हणतात. काहीवेळा अपवाद वगळता जगभरातील सर्वच समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारच्या नैसर्गिक रित्या भरती ओहोटी येत असतात.
भरती-ओहोटीचे चक्र
भरती-ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. भरतीची कमाल मर्यादा गाठल्या नंतर ओहोटीला सुरुवात होते. तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीला पुन्हा सुरुवात होते. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटी चे हे चक्र पुन्हा पुन्हा पूर्ण होत असते.
भरती ओहोटी मागील शास्त्र
भरती-ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरण मध्ये सातत्याने घडणारी एक घटना आहे. ही घटना सहज व स्वाभाविक वाटते परंतु या घटनेच्या मागे सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांचा संबंध येतो.
केंद्रोत्सारी बल
परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बदल किंवा प्रेरणा मिळत असते.
ही प्रेरणा पृथ्वीचा केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात.
गुरुत्वीय बल पृथ्वीवरील कोणतीही वस्तू केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात घेतली जाऊ शकते, परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या केंद्र काम मध्ये असलेली गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा त्या वस्तूला केंद्राच्या दिशेने पुन्हा परत घेऊन येत असते.
हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असते.
त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते ती व.स्तू पृथ्वीच्या परिवलनामुळे किंवा परिभ्रमणामुळे जागा बदलत नाही.
भरती ओहोटीची कारणे
सागर जलाचे हालचाल होत असते. आणि विविध ठिकाणी सागराला भरती-ओहोटी येत असते यासाठी पुढील घटक कारणीभूत ठरतात. चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल.
पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे व चंद्राचे पृथ्वीभोवती फिरता फिरता अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे.
परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा. हे काही महत्त्वाचे कारणे आहेत.
चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल यांची परिणामकारकता
सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ आहे. त्यामुळे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बल पेक्षा जास्त परिणामकारक रित्या कार्य करत असते.
भरती-ओहोटीच्या स्थिती
पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणी त्यावेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येत असते.
ज्यावेळेस शून्य अंश रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180 अंश रेखावृत्तावर सुद्धा भरती असते .
रेखावृत्त व 180 अंश रेखावृत्त यावर भरती असताना त्या रेखावृत्ताना काटकोन स्थितीत असणाऱ्या ठिकाणी ओहोटी असते. म्हणजे शून्य अंश रेखावृत्त व 180 अंश रेखावृत्त यावर भरती असताना त्याच वेळी 90 अंश पूर्व रेखावृत्त आणि 90 अंश पश्चिम रेखावृत्त यावर ओहोटी असते.
भरती ओहोटी चे प्रकार
भरती ओहोटी चे दोन प्रकार पडतात
.उधाणाची भरती ओहोटी आणि भांगाची भरती ओहोटी
उधाणाची भरती ओहोटी.
चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्यादिवशी उधाणाची भरती ओहोटी येते.
उधाणाची भरती सरासरी येणाऱ्या भरती पेक्षा फार मोठी असते.
उधाणाच्या भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा तयार झाल्यामुळे तिच्या ठिकाणी पाणी अधिक खोल पर्यंत ओसरते या ओहोटीला उधाणाची ओहोटी म्हणतात.
भांगाची भरती ओहोटी
चंद्र पृथ्वीभोवती फिरताना शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला पृथ्वी आणि सूर्य यांच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यात पूरक न होता परस्परांना काटकोनात असते, त्यामुळे या दोन दिवशी भांगाची भरती ओहोटी येते भांगाची भरतीमुळे पाण्याचीची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व भांगाच्या व त्यामुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी होते.
भरती ओहोटी चे परिणाम
→ भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.
→ भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचर्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.
→ भरती-ओहोटीमुळे बंदरावरील कचरा हा समुद्रात जात असल्यामुळे बंदरे गाळाने भरत नाहीत.
→ भरतीच्या वेळेस जहाजाचे बंदरात आणणे सोपे जाते.
→ भरतीचे पाणी मीठा घरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
→ भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज सुद्धा निर्माण करता येते.
→ भरती-ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास आणि जतन होते.
→ भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना मासेमारी करणाऱ्या व्यक्तींना अपघात होउ शकतो.
भरती-ओहोटीच्या वेळेतील दररोजचा बदल
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची भरती ओहोटीची वेळ दररोज बदलत असते.
एका दिवसातील दोन भरतीच्या वेळी किंवा दोन व त्यांच्या वेळेतील फरक हा सुमारे बारा तास 25 मिनिटाचा असतो.
पुढील दिवसातील दोन भरतीच्या किंवा दोन ओहोटीच्या त्यांच्या वेळा त्या त्या दिवसाच्या अगोदरच्या दिवसातील दोन भरतीच्या किंवा दोन ओहोटीच्या त्यांच्या वेळा पेक्षा प्रत्येकी सुमारे पन्नास मिनिटे पुढच्या असतात.
लाटा
वाऱ्या कडून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे सागराचे पाणी प्रवाही होते.
वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते आणि पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यालाच लाटा असे म्हणतात.
लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली, मागेपुढे होते या लाटा त्यांच्या सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्यामुळेच त्या उथळ किनारी भागात येऊन पडतात, सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा उसळत असतात .
लाटांची निर्मिती ही एक नैसर्गिक आणि नियमित होणारी घटना आहे.
लाटेची रचना
वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्यासमोर खोलगट भाग तयार होतो.
लाटेच्या उंच भागाला शीर्ष व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात.
शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील अंतर ही लाटेची उंची असते.
दोनशे शीर्षमधील किंवा दोन द्रोणी मधील अंतर ही लाटेची लांबी असते.
लाटेची लांबी, उंची व लाटेचा वेग हा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो.
लाटांची गती
सागरी किनार्यावर उभे राहून समुद्राकडे पाहिले असता लाटा किनाऱ्याकडे येतांना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांब वर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होते ती किनाऱ्यापर्यंत येत नाही म्हणजेच त्यातील पाणी पुढे येत नाही.
लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते.
लाटांच्या निर्मितीची कारणे
लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण हे वारा आहे.
काही वेळा सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा लाटा निर्माण होतात.
त्सुनामी
सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंचीच्या विध्वंशक लाटा म्हणजेच त्सुनामी होय .
त्सुनामी लाटांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते.
2004 साली सुमात्रा व इंडोनेशिया बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या.
त्यांचा तडाका भारतामध्ये पूर्व किनारा व श्रीलंका या देशांना सुद्धा बसला होता. त्सुनामीचा धोका निर्माण झाल्यास किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंचावर जाणे फायदेशीर ठरते, त्यामुळे जीवित हानी टाळता येते.
लाटांचे परिणाम
लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची झीज होते.
उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळन निर्माण होते.
Reply
|
sir please check unit test first question chuk ki barobar
ReplyDeleteThanks for noticed corrected the answer by me
DeleteHi
ReplyDelete