Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday 29 August 2024

Importance of the day 30 ऑगस्ट दिनविशेष



Importance of the day

 30 ऑगस्ट दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1574 : गुरु रामदास हे शीखांचे चौथे गुरू झाले.

1835 : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.

1835 : अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना झाली.

1909 : चार्ल्स डूलिटल वॉलकॉटने बर्गेस शेल जीवाश्म शोधला.

1945 : दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगला जपानी राजवटीपासून मुक्त केले.

1967 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले आफ्रिकन अमेरिकन न्यायमूर्ती म्हणून थर्गड मार्शल यांची पुष्टी झाली.

1979 : धूमकेतू हॉवर्ड-कुमेन-मायकेल सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांइतकी उर्जा सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. मानवी इतिहासातील अशा धूमकेतूच्या प्रभावाची ही पहिलीच नोंद आहे.

2003 : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

2009 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-I, औपचारिक समाप्ती.

2021 : शेवटच्या उरलेल्या अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले आणि युएसचा युद्धातील सहभाग संपवला.

*📚 इयत्ता - 5 वी*

*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_21.html*

*📚 इयत्ता - 6 वी*

*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_83.html*

 दिनविशेष - जन्म :

1720 : ‘सॅम्युअल व्हिटब्रेड’ – व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1796)

1812 : ‘अगोगोस्टन हरसत्थी’ – ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 जुलै 1869)

1813 : ‘ना. धों. ताम्हनकर’ – बालसाहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1961)

1850 : ‘काशिनाथ त्र्यंबक तेलंग’ – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 1893)

1871 : ‘अर्नेस्ट रुदरफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑक्टोबर 1937)

1883 : ‘जगन्नाथ गणेश गुणे’ – स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1966 – मुंबई)

1903 : ‘भगवतीचरण वर्मा’ – हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑक्टोबर 1981)

1904 : ‘नवल होर्मुसजी टाटा’ – उद्योगपती यांचा जन्म.

1923 : ‘शंकरदास केसरीलाल’ – हिंदी चित्रपट गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 14 डिसेंबर 1966)

1930 : ‘दशरथ पुजारी’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 2008 – डोंबिवली, मुंबई)

1930 : ‘वॉरन बफे’ – अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.

1934 : ‘बाळू गुप्ते’ – लेग स्पिन गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2005)

1937 : ‘ब्रुस मॅक्लारेन’ – मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 1970)

1954 : ‘अलेक्झांडर लुकासेंको’ – बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.

1954 : ‘रवीशंकर प्रसाद’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.

*📚 इयत्ता -१ ली*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_31.html*

*📚 इयत्ता - २ री*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_11.html*

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1773 : ‘नारायणराव पेशवे’ – यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1755)

1940 : ‘सर जे. जे. थॉमसन’ – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 18 डिसेंबर 1856)

1947 : ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ – मराठी कवी यांचे निधन. (जन्म : 1 जून 1872)

1981 : ‘जे. पी. नाईक’ – शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1907)

1994 : ‘शंकर गोपाळ तुळपुळे’ – मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1914)

1998 : ‘नरुभाऊ लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1909)

2003 : ‘चार्ल्स ब्रॉन्सन’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1921)

2014 : ‘बिपन चंद्र’ – भारतीय इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 27 मे 1928)

2015 : ‘एम. एम. कळबुर्गी’ – भारतीय विद्वान लेखक यांचे निधन. (जन्म : 28 नोव्हेंबर 1938

No comments:

Post a Comment