Importance of the day 31 ऑगस्ट दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1920 : डेट्रॉईटमध्ये 8 MK ने प्रसारित केलेला पहिला रेडिओ कार्यक्रम.
1920 : खिलाफत चळवळीची सुरुवात.
1947 : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
1957 : मलाया (आता मलेशिया) फेडरेशनने युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळवले.
1962 : त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
1996 : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
1970 : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
1971 : अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
1991 : किर्गिस्तानला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
1996 : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार.
2016 : ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले.
*📝वर्गपूर्व तयारी 7 वी इंग्रजी*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_43.html
*🪀वर्गपूर्व तयारी 8 वी इंग्रजी*
https://www.dnyaneshwarkute.com/p/english.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1569 : ‘जहांगीर’ – 4 था मुघल सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑक्टोबर 1627)
1870 : ‘मारिया माँटेसरी’ – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ, पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू : 6 मे 1952)
1902 : ‘दामू धोत्रे’ – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक यांचा जन्म.
1907 : ‘रॅमन मॅगसेसे’ – फिलिपाइन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 मार्च 1957)
1919 : ‘अमृता प्रीतम’ – कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 ऑक्टोबर 2005)
1931 : ‘जयवंत कुलकर्णी’ – पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 2005)
1940 : ‘शिवाजी सावंत’ – मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 18 सप्टेंबर 2002)
1944 : ‘क्लाइव्ह लॉइड’ – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
1963 : ‘ऋतुपर्णा घोष’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
1969 : ‘जवागल श्रीनाथ’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
1979 : ‘युवन शंकर राजा’ – भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1422 : ‘हेन्री (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 16 सप्टेंबर 1386)
1973 : ‘ताराबाई मोडक’ – शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या यांचे निधन. (जन्म : 19 एप्रिल 1892)
1995 : ‘सरदार बियंत सिंग’ – पंजाबचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1922)
2012 : ‘काशीराम राणा’ – भाजपाचे लोकसभा सदस्य यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1938)
2020 : ‘प्रणब मुखर्जी’ – भारताचे 13वे राष्ट्रपती (जन्म : 11 डिसेंबर 1935)
No comments:
Post a Comment